Shahaji Bapu । शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना श्रीकृष्णांची उपमा दिली होती, तर स्वत: आपण संजय असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेनेचे नेते शहाजीबापू (Shahaji Bapu) पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.
“संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाभारत वाचावे, महाभारतातील संजय हा श्रीकृष्णाजवळ बसलेला नव्हता तर अंधळ्या धृतराष्ट्राजवळ बसलेला होता, त्यामुळे संजय राऊत यांना उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत असं म्हणायचं होतं का?”, असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे राऊत यांनी इतिहासाचा निट अभ्यास करून बोलावं, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.
Shahaji Bapu Patil criticized Sanjay Raut
त्याचबरोबर “नरेंद्र मोदी हे विष्णूचा अवतार आहेत, ट्रम्प तिथे भारताला धु धु धुतोय आणि विष्णूचे अवतार गप्प आहेत. अख्ख जग ट्रम्पच्या विरोधात उठलं आहे आणि फक्त एकच देश भारत देश तोंडात गोळ्या घालून बसलाय”, असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. यावर देखील शहाजीबापू यांनी संजय राऊत यांना सुनावलं आहे.
संजय राऊत हे विष्णू आणि कृष्णाच्या अवतारांमध्ये संजय राऊत का गुतंत आहेत?, ट्रम्प, मोदी, चीन, जपान यांच्यावर का बोलत आहेत?, असा सवाल शहाजीबापूंनी केलाय. “मोदी साहेबांवर टीका करून स्वतःला महत्त्व प्राप्त करून घेऊ नका, आधी वार्डात निवडून यायचं बघा”, असा चिमटा यावेळी शहाजीबापू यांनी संजय राऊत यांना काढलाय.
महत्वाच्या बातम्या :