पुणे | गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या वादग्रस्त परिस्थितीनंतर पुणे महानगरपालिकेने (PMC) शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. यापुढे रुग्णांवर तातडीने उपचार करण्याऐवजी कोणतेही डिपॉझिट किंवा अनामत रक्कम घेऊ नये, असे आदेश पुणे महानगरपालिकेने बजावले आहेत.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी १० लाख रुपयांची मागणी केल्यामुळे उपचारास विलंब झाला आणि त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन समित्या नेमण्यात आल्या होत्या. राज्य सरकारच्या समितीचा अहवाल नुकताच सादर झाला असून, त्यामध्ये रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.
या पार्श्वभूमीवर PMC ने खासगी रुग्णालयांसाठी स्पष्ट निर्देश जारी करत, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांवर तत्काळ उपचार करणे आवश्यक असून, आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये, याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.
PMC has issued a notice to Deenanath Mangeshkar Hospital
PMC च्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “रुग्णावरील आपत्कालीन उपचार हे सर्वोच्च प्राधान्य असावे. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून डिपॉझिट घेण्याऐवजी प्रथम उपचार करावेत व त्यानंतरच आर्थिक बाबी हाताळाव्यात.”
दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिसांनीही हालचाली सुरू केल्या आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेत वैद्यकीय निष्काळजीपणा आढळल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.( Pune Police may file a case if medical negligence is confirmed. ) ससून रुग्णालयाच्या अधीक्षकांना यासंदर्भात अधिकृत पत्र पाठवून संबंधित माहिती आणि कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रुग्णालयात महिलेला सुमारे 5.30 तास थांबवण्यात आले होते. PMC च्या या निर्णयामुळे पुणे शहरातील रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना तातडीच्या उपचारांमध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या