Supriya Sule । पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप सर्वपक्षीय राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. यावर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दीनानाथ रुग्णालयावर कारवाई झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Supriya Sule Reaction On Deenanath Mangeshkar Hospital Woman Death
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आदरणीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना आणि श्रीनिवास पाटील हे कलेक्टर असताना ही जागा देण्याबाबत प्रोसेस झाली आणि लतादीदींच्या पुढाकाराने हे हॉस्पिटल उभारण्यात आलं. हा या रुग्णालयाचा इतिहास आहे. त्यानंतर अनेक वर्ष रुग्णांना तिथे उपचार मिळत आहेत. पण देशातील एवढ्या मोठ्या घराण्याचं नाव या रुग्णालयाला देण्यात आला असताना एवढी मोठी दुर्दैवी दुर्घटना होते, हे अतिशय धक्कादायक आणि संतापजनक आहे.”
“ज्या पद्धतीने पीडित महिलेला रुग्णालयाने वागणूक दिली, त्याचा करावा तितका निषेध थोडा आहे. त्यामुळे रुग्णालयावर कारवाई व्हायला पाहिजे”, अशीही मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. एक डॉक्टर वाईट वागला म्हणून सरसकट सगळे डॉक्टर वाईट होत नाहीत. उत्तम डॉक्टरांचा देश म्हणून भारताकडे बघितलं जातं आणि आपल्याकडे डॉक्टरला देव समजण्याची धारणा आहे. त्यामुळे दीनानाथ रुग्णालयाबाबत कुठलेही राजकारण न आणता या संबंधित प्रशासनावर कारवाई केली पाहिजे, असंही सुप्रिया सुळेंनी म्हंटल आहे.
महत्वाच्या बातम्या :