Share

Alia Bhatt नाही Ranbir Kapoor ची पहिली पत्नी? अभिनेत्यानेच केला मोठा खुलासा

by MHD
Ranbir Kapoor reveals Alia Bhatt is not his first wife

Ranbir Kapoor । बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये रणबीर कपूरचे नाव घेतले जाते. जगभरात त्याच्या चाहत्यांची संख्या देखील जास्त आहे. सोशल मीडियावरही तो सक्रिय असतो. ॲनिमल या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली.

चाहते आता ॲनिमल (Animal) या चित्रपटाच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) एप्रिल 2018 मध्ये एकमेकांना डेट करत होते. त्यांनी एप्रिल 2022 मध्ये लग्न केले. या जोडप्याला एक गोंडस मुलगी देखील आहे. (Ranbir Kapoor wife)

अशातच रणबीर कपूरने दिलेल्या मुलाखतीत आलिया ही त्याची पहिली पत्नी नाही, असं म्हटलं आहे. रणबीरच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. “एक चाहती तिच्यासोबत ब्राम्हण घेऊन बंगल्यावर आली आणि तिने गेटवरच माझ्यासोबत लग्न केल. त्यानंतर ती मला पुन्हा भेटली नाही. मी अजूनही पहिल्या पत्नीला भेटण्याची वाट पाहत आहे,” असे रणबीर कपूर म्हणाला.

“मी याला वेडेपणा म्हणणार नाही. कारण याचा वापर नकारात्मक अर्थाने वापरला जातो,” असाही रणबीर कपूर म्हणाला. दरम्यान, रणबीर कपूर याने सावरियां या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

Ranbir Kapoor Upcoming movies

त्याने ॲनिमल या चित्रपटाशिवाय ‘बर्फी’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘रॉकस्टार’, ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातून (Ranbir Kapoor film) सर्वांना वेडच लावलं. लवकरच तो ‘ब्रह्मास्त्र 2’, ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. त्याचे हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात का? याकडे विशेष लक्ष असेल.

महत्त्वाच्या बातम्या :

Ranbir Kapoor has said in an interview that Alia is not his first wife. Surprise is being expressed over Ranbir statement.

Entertainment Marathi News

Join WhatsApp

Join Now