KKR vs RCB । आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यात 22 मार्च रोजी होणार आहे. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) कोलकात्याचं, तर रजत पाटीदार (Rajat Patidar) आरसीबीचं नेतृत्व करणार आहे.
अशातच आता आयपीएलचा पहिला सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्याच्या दिवशी 10 टक्के पाऊस पडू शकतो.
जर हवामानात बदल झाला तर 70 टक्क्यांपर्यंत ही शक्यता वाढेल. रात्री 11 वाजता पावसाची शक्यता आहे. जर सामना सुरु असताना पाऊस पडला आणि रसामना द्द करण्याची वेळ आली तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल.
त्यामुळे पाऊस पडणार की नाही? असा सवाल दोन्ही संघांच्या चाहत्यांना पडत आहे. दरम्यान कोलकाता आणि बंगळुरु आयपीएलमध्ये 34 वेळा आमनेसामने आले असून यामध्ये कोलकात्याने 20 तर बंगळुरुने 14 सामन्यात विजय मिळवला आहे.
RCB Squad For IPL 2025
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, जोश हेझलवूड, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक दार, सुयश शर्मा, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, नुवान थुशारा, मनोज बंडल, मनोज बंधू, जॉब, बिनबुड, स्व. चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.
KKR Squad For IPL 2025
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, अंगकृष रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, ॲनरिक नोर्टजे, हर्षित राणा, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, मयंक जॉन मार्केन्सन, मयंक पानवडे, मानिश रोंडे, पो. लवनीथ सिसोदिया, अनुकुल रॉय, मोईन अली, चेतन सकरिया
महत्त्वाच्या बातम्या :