Dhananjay Munde । अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. अशातच आता त्यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे.
“जास्तीत जास्त नऊ-दहा महिन्यांत धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार आहे. याबाबत छत्रपती संभाजीनगर कोर्टात केस सुरू आहे. याप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी जे खोटे ॲफेडेव्हिट दिले असल्याने मी परळीमध्ये केस दाखल केली आहे,” असे करुणा मुंडे (Karuna Munde) म्हणाल्या.
“मी त्यांची पहिली पत्नी आहे, त्यामुळे मला मेंटेनन्स पाहिजे. घरगुती हिंसाचार झाल्याप्रकरणी देखील याचिका दाखल केली होती. खालच्या कोर्टात आम्हाला न्याय मिळाला, मी 15 लाखांची मागणी केली होती. पण त्यांनी 2 लाखांचा मेंटेनन्स दिला आहे,” असेही करुणा मुंडे यांनी स्पष्ट केले.
“धनंजय मुंडे यांना आम्हाला 2 लाख रुपये देखील द्यायचे नाहीत. त्यासाठी मी ऑर्डरच्या विरोधात धनंजय मुंडे सेशन कोर्टामध्ये गेले आहेत,” असा दावा करूणा मुंडे यांनी केला आहे. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या आमदारकीबद्दल केलेल्या दाव्यावरून मोठी खळबळ उडाली आहे.
Karuna Munde on Dhananjay Munde
त्यामुळे आता धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापाठोपाठ आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा लागतोय की काय? असा सवाल राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. जर असे झाले तर धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या :