Share

“मोदी, शाह, फडणवीस यांची नावे घेतलीस तर याद राख!” नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंना इशारा

Narayan Rane warns Aaditya Thackeray: “Don’t name Modi, Shah, or Fadnavis – remember this!”

Published On: 

Narayan Rane criticized uddhav thackeray

🕒 1 min read

मुंबई-  मुसळधार पावसामुळे भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये पाणी साचल्याने वादंग सुरू आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी थेट केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणेंनी ( Narayan Rane ) पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांना थेट इशारा दिला. “तू मोदी, शाह, फडणवीस यांची नावे घेतलीस तर याद राख!”

राणेंनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करत म्हटलं की, “तू 2005 चा पाऊस विसरलास का? त्या वेळी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता, तरी मुंबई बुडाली नाही.” त्यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत उत्पन्नाचे साधन काय होते यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Narayan Rane Warns Aaditya Thackeray

2005 साली महापालिकेत कुणाची सत्ता होती, मिठी नदी नव्हती का,आता आली का? तेव्हा साफ केली होती का? तरी पण पाणी का भरले? वस्त्यांमध्ये पाणी का गेले? किती वय होते तुझे, आठवण कर, काहीही बोलतो. कमाईचे साधन निर्माण करण्यासाठी काहीही बोलतो, असे सवाल नारायण राणेंनी उपस्थित केले आहेत.

सन 1985 साली मी नगरसेवक झालो, मी बेस्ट चेअरमन झालो, तेव्हा पालिकेत काय चालले होते, तू नव्हता, मी होतो. टक्केवारी किती असायची? संजय राऊत बाळासाहेबांविरुद्ध बोलायचा, तो संपादक म्हणून आला, शिवसेनेत प्रवेश केला नाही, नंतर कपडे उतरवेल बोलला. आता, सकाळी उठला की प्रेसकडे धावतो, असे म्हणत नारायण राणेंनी संजय राऊतांवरही टीका केली.

भ्रष्टाचार हा उद्धव व आदित्यच्या रक्तात भिनला आहे, सन 1985 च्या आधी यांचे काय उत्पन्न होते? स्टेटमेंट काढा, उत्पन्नाचे साधन काय बाळासाहेबांच्या नावाने बावळट मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात झाला, त्याला फायनान्स माहिती नाही, रोजगार कळत नाही, असे म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

संजय राऊत, दिनो मोर्या, केतन कदम यांचाही उल्लेख करून राणेंनी त्यांच्यावरही आरोप केले. “दिसत नसलेलं पाणी दाखवतोस, त्याचं उत्तर दे,” असा थेट सवालही त्यांनी ठाकरेंना विचारला. त्याचबरोबर, दिनो मोर्या कोण, आदित्य त्याच्याकडे का येतो, काय करतात, ही सगळी माहिती माझ्याकडे आहे. पण, मी सगळी माहिती ठेवून शांत आहे,” अशी इशारवजा टिप्पणी करून राजकीय वातावरण तापवलं.

📌 महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या