🕒 1 min read
मुंबई: राज्यात वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे हुंडाबळीचा मुद्दा गाजत असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर ( Siddhant Shirsat ) गंभीर आरोप झाले आहेत. सिद्धांत शिरसाट याने पत्नीचा मानसिक, शारिरीक छळ, फसवणूक केल्याचा, आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या महिलेने वकिलामार्फत कायदेशीर तक्रार दाखल करत सिद्धांतवर विविध गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तिचा दावा आहे की, “सिद्धांतने मला धमकी दिली की ‘फोन केलास तर तुझं कुटुंब गुंडांकडून संपवेन’.”
Siddhant Shirsat Accused of Threats and Abuse by Wife
तसेच सिद्धांतने ‘माझे वडील मंत्री आहेत, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उजवे हात आहेत’ अशी धमकी देत राजकीय दडपशाहीचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
दरम्यान, वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर आधीच टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे आता संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांतवर आरोप झाल्यानंतर प्रशासन व महिला आयोग काय भूमिका घेते, याकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.
Rupali Chakankar Already Under Fire
दरम्यान, वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाईतील दिरंगाई आणि दुर्लक्ष केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे चाकणकर यांच्यावर विरोधकांनी तीव्र टीका केली असून राजीनाम्याची मागणी देखील केली होती. अशा पार्श्वभूमीवर आता संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर पत्नीने गंभीर आरोप केल्याने राजकीय आणि सामाजिक स्तरावर खळबळ माजली आहे.
यामुळे महिला अत्याचारप्रकरणी महिला आयोग, पोलिस प्रशासन आणि राज्य सरकार यांची भूमिका पारदर्शक, निष्पक्ष आणि ठोस राहते का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विशेषतः महिला आयोग यावेळी काय पावले उचलते, हे त्यांच्या विश्वासार्हतेच्या कसोटीचे क्षण ठरणार आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांतवर विवाहित महिलेचे गंभीर आरोप
- सुरेश रैनाची पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जमध्ये होणार एन्ट्री! सांभाळणार ‘ही’ सर्वात मोठी जबाबदारी
- महाराष्ट्रात पावसाचा कहर; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस पुन्हा झोडपणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now