Share

महाराष्ट्रात पावसाचा कहर; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस पुन्हा झोडपणार

Maharashtra witnesses heavy rainfall (Maharashtra Rain) with IMD issuing red alerts for Ratnagiri, Sindhudurg and Kolhapur. Mumbai under yellow alert. Citizens are urged to take precautions.

Published On: 

Rain wreaks havoc in Maharashtra; Rain will hit these districts of Maharashtra again

🕒 1 min read

महाराष्ट्रात यंदा मान्सूनने १२ दिवस आधीच हजेरी लावली असून गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. मंगळवारीही काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबईत आज सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असून हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, तर पुणे, सातारा, बीड आणि नांदेडसह काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील अलर्ट तपशील:
🔴 रेड अलर्ट: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा घाटमाथा
🟠 ऑरेंज अलर्ट: रायगड, पुणे घाटमाथा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड
🟡 येलो अलर्ट: मुंबई, ठाणे, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, गडचिरोली

Rain wreaks havoc in Maharashtra; Rain will hit these districts of Maharashtra again

मुंबईत परिस्थिती:

सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईत काही ठिकाणी पाणी साचले होते आणि रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता. मंगळवारी मात्र रिमझिम स्वरूपात पाऊस सुरू आहे. हिंदमाता, किंग सर्कल, अंधेरी, वांद्रे भागात पावसाचे वातावरण आहे.

पुणे जिल्ह्यात तीन मृत्यू:

कर्वेनगरमध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू, भामा आसखेड धरणाजवळ वीज कोसळून तरुणाचा मृत्यू, तर दौंडमध्ये एका महिलेस प्राण गमवावा लागला.

शेतकऱ्यांचे नुकसान:

नाशिक जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. येवल्यात झालेल्या पावसामुळे शेतात साठवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

नागरिकांना इशारा:

हवामान विभागाकडून पुढील २४ तास अतिशय महत्त्वाचे असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही