🕒 1 min read
मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्सकडून पराभव पत्करावा लागला असून त्यामुळे त्यांचा अंतिम फेरीत थेट प्रवेशाचा मार्ग बंद झाला आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाबने मुंबईने दिलेलं 185 धावांचं आव्हान 9 चेंडू राखून 3 विकेट्सने पार केलं. या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) आपल्या सहकाऱ्यांना थेट आणि स्पष्ट संदेश दिला – “हा फक्त एक झटका होता, यातून शिका आणि नॉकआउटसाठी सज्ज व्हा.”
मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवने 57 धावा करत सर्वाधिक योगदान दिलं. मात्र संघ अपेक्षित 200 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. याच बाबत सूर्याने पहिल्या डावानंतर प्रतिक्रिया दिली होती, आणि तीच भावना हार्दिकनेही सामन्यानंतर व्यक्त केली.
PBKS vs MI: “It was just a setback”; Hardik Pandya’s clear message to the players after the defeat
हार्दिक म्हणाला, “खेळपट्टी पाहता 20 धावा कमी पडल्या. आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो नाही. पण आयपीएलमध्ये असं होतं. या फ्रँचायजीने 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे, त्यामुळे आम्हाला नक्कीच परत उभं राहता येईल.”
मुंबईचा एलिमिनेटर सामना 30 मे रोजी खेळला जाणार असून, अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आता त्यांना सलग दोन सामने जिंकावे लागणार आहेत.
दरम्यान, पंजाबकडून जोश इंग्लिस (73), प्रियांश आर्या (62), आणि कर्णधार श्रेयस अय्यर (26 नाबाद) यांनी ठाम बॅटिंग करत संघाला मोठा विजय मिळवून दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- तुळजापूर-औसा महामार्गावर भीषण अपघात; भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे दुःखद निधन
- नागरिकांनो घरातच थांबा, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट
- ‘हेरा फेरी 3’मधून परेश रावल बाहेर का पडले? चित्रपट सोडण्यामागचं खरं कारण आलं समोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now