Share

करुणा मुंडेंसोबतच्या नात्याबद्दल Dhananjay Munde कोर्टात नेमकं काय म्हणाले? महत्त्वाची माहिती समोर

Karuna Munde lawyers have given information about what issues Dhananjay Munde has raised in his appeal.

by MHD

Published On: 

Dhananjay Munde and Karuna Munde case hearing on 29th March

Dhananjay Munde । करूणा मुंडे (Karuna Munde) यांना 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश वांद्रे कोर्टाकडून (Bandra Court) देण्यात आले होते. या प्रकरणातील कोर्टाच्या आदेशाला अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी आव्हानात्मक याचिका दाखल केली आहे.

आज या याचिकेवर सुनावणी पार पडली. या याचिकेवर संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. पण याप्रकरणी कोर्टाने आज निकाल दिला नाही. कोर्टाकडून 29 मार्च रोजी या प्रकरणाचा निकाल दिला जाणार आहे, याबाबत करुणा मुंडे यांच्या वकिलांनी खुलासा केला आहे.

धनंजय मुंडे यांनी अपिलामध्ये कोणते मुद्दे मांडले आहेत? याची माहिती करुणा मुंडेंच्या वकिलांनी दिली आहे. “मी करुणा मुंडेंशी लग्न केले नाही, आम्ही लिव्ह इन रिलेशनशिमध्ये होतो, असे धनंजय मुंडे म्हणतात. पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार लिव्ह-इनचा काळ इतका मोठा असू शकत नाही. लिव्ह-इनचा काळ दोन-तीन वर्षांचा असतो, असे कोर्टाचे मत आहे, असे करुणा मुंडेंच्या वकिलांनी स्पष्ट केले.

दरम्यान, करुणा मुंडे या आर्थिकदृष्ट्या स्ट्राँग असून त्या राजकीय संघटना चालवतात. तसेच त्यांच्या नावावर काही कंपन्या आहेत, असे मुद्दे धनंजय मुंडे यांनी अपिलामध्ये मांडले आहेत, अशीदेखील माहिती करुणा मुंडेंच्या वकिलांनी दिली आहे.

Karuna Munde claims Dhananjay Munde  

त्यामुळे आता करुणा मुंडे यांच्याकडून दरमहा 15 लाख रुपये किंवा 9 लाख रुपये देण्याची मागणी कोर्टाकडे करण्यात आली आहे. अशातच आता या प्रकरणांमध्ये कोर्ट काय निर्णय देणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही