Walmik Karad । संतोष देशमुख हत्याप्रकरणाची (Santosh Deshmukh murder case) आज केज कोर्टामध्ये पहिली सुनावणी पार पडली. देशमुख कुटुंबियांसह संपूर्ण राज्याचे या सुनावणीकडे लक्ष होते. अशातच याप्रकरणी वाल्मिक कराड याच्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
पहिल्या दिवशीची सुनावणी ही सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली. सुरुवातीला आरोपींची ओळख परेड झाली आणि कोर्टाने आरोपींना हात वर करायला सांगितला. कराड सोडून इतर आरोपींनी हात वर केले. पण कराडने कोर्टाला हात जोडले.
त्याच्या या कृतीचा अर्थ काय? हे अद्यापही समजू शकलं नाही. तसेच कोर्टाने देशमुख हत्याप्रकरणातील सर्व आरोपींना वकील मिळाले आहेत का? चार्जशीट मिळाली आहे का? असे प्रश्न कोर्टाने विचारले. त्यावर आरोपींना हो असे उत्तर दिले.
याशिवाय कोर्टाने तपासावर काही आक्षेप आहेत का? असा प्रश्न विचारला असता फिर्यादी शिवराज देशमुख यांनी नाही असे उत्तर दिले. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मार्च रोजी पार पडणार आहे.
Walmik Karad joined hands in court
दरम्यान, आरोपींच्या वकिलांनी खंडणी आणि हत्येतील सीडीआर देण्याची मागणी केली. आरोपपत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसचा उल्लेख केलेला पुरावा आणि जबाबाच्या कॉपी मागितल्या आहे. त्यांची ही मागणी मान्य होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :