Salman Khan । प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा लवकरच सिकंदर (Sikandar) हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमातील एक गाणे रिलीज झाले असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रिलीजनंतर सिनेमा चांगली कमाई करू शकतो.
परंतु, अभिनेत्री दिया मिर्झाने सलमान खानच्या सेटवरवरील खळबळजनक खुलासा केला आहे. तुमको ना भूल पाएँगे (Tumko Na Bhool Paayenge) या सिनेमामध्ये सलमान खान आणि दिया मिर्झा मुख्य भूमिकेत होते. यावेळी दिया मिर्झाला सेटवर काय अनुभव आला? याची माहिती तिने दिली आहे.
“अनुभवी क्रू मेंबर्स असूनही सेटवर असणाऱ्या महिलांकडे दुर्लक्ष केले जायचे. मला पटकथाही सहज मिळाली नाही. त्या ठिकाणी कोणतीच कार्यशाळा नव्हती. वाचन नव्हते. माझे पात्र राजस्थानचे होते, पण मी भोजपुरी बोलत होती आणि संवादही तिला काही काळापूर्वीच दिले होते,” असा दावा दिया मिर्झाने केला.
“ज्यावेळी मी त्यांना माझ्या भूमिकेबद्दल विचारले त्यावेळी त्यांनी मला तू खूप प्रश्न विचारतेस. हे करू नकोस. तुला जेवढं सांगितलं आहे, तेवढंच कर. असे म्हणत मला टाळले,” असा धक्कादायक खुलासा दिया मिर्झाने केला.
Dia Mirza, Ibrahim Ali Khan and Khushi Kapoor Movie Nadaaniyan
दिया मिर्झाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती नुकतीच नादानियां (Nadaaniyan) सिनेमामध्ये दिसली होती. या सिनेमामध्ये इब्राहिम अली खानचा आणि खुशी कपूर देखील मुख्य भूमिकेत आहे. इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) आणि खुशी कपूर (Khushi Kapoor) यांचा हा पहिला सिनेमा आहे.
महत्त्वाच्या बातम्या :