Share

Satish Bhosale चा पाय खोलात, आणखी एक गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

Satish Bhosale was arrested yesterday from Prayagraj in Uttar Pradesh, and a fourth case has been registered against him.

by MHD

Published On: 

Forest Department files case against Satish Bhosale

🕒 1 min read

Satish Bhosale । बीडमध्ये ढाकणे पिता-पुत्राला मारहाण करणारा सतीश भोसले उर्फ खोक्या भाई (Khokya Bhai) चांगलाच चर्चेत आला आहे. त्याचे मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. परंतु, तो पोलिसांना सापडत नव्हता.

अखेर काल त्याला उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून अटक (Satish Bhosale arrest) केली आहे. आज त्याला बीड पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल. यादरम्यान त्याची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाईल. अशातच आता पुन्हा एकदा सतीश भोसलेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

त्याच्याविरोधात वनविभागाकडून वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश भोसलेला राहत असेलल्या जागेचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी एकूण सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

जर त्याला या सात दिवसात मालकी हक्क सिद्ध करता आला नाही तर वनविभागाकडून कारवाई अंतर्गत अतिक्रमण काढण्यात येईल. यामुळे सतीश भोसलेच्या अडचणीत मोठी भर पडली असल्याचे पाहायला मिळत आहे.

Forest Department action against Satish Bhosale

इतकेच नाही तर सतीश भोसलेविरोधात बीडसह अन्य राज्यांतील पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत. हरिण, मोर आणि ससा आणि इतर वन्यप्राण्यांच्या शिकारीचा नाद त्याला अडचणीत आणताना दिसत आहे. पोलिसांनी बेड्या ठोकताच वनविभागही अ‍ॅक्शन मोडवर आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)