Dhananjay Deshmukh । मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. अशातच आता धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर (Dada Khindkar) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दिवंगत संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) न्याय मिळण्यासाठी काढलेल्या प्रत्येक आंदोलनामध्ये तो धनंजय देशमुख यांच्यासोबत दिसला आहे. नुकताच त्याचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जरी त्याने हा व्हिडिओ जुना आहे, असे सांगितले तरी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे.
दादा खिंडकर स्वतःहून पोलिसांना शरण (Dada Khindkar surrender) आला आहे. दादा खिंडकर याच्याविरोधात एक दोन नाही तर तब्बल १२ गुन्हे दाखल आहेत. यात पिंपळनेर पाेलिस ठाण्यात ६, बीडमधील शिवाजीनगर ठाणे ४ आणि पेठबीड ठाण्यात २ गुन्हे दाखल केले आहेत.
यात शासकीय नोकरावर जिवघेणा हल्ला, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि रस्त्यात अडवून लुट करणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. अशातच आता त्याला मारहाणीप्रकरणी पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Dada Khindkar surrender to Police
एकीकडे संतोष देशमुखांची न्यायासाठी रस्त्यावर तर दुसरीकडे एका तरुणाला अमानुषपणे मारहाण करणे कितपत योग्य आहे? असा सवाल दादा खिंडकरमुळे उपस्थित होत आहे. यावर आता धनंजय देशमुख काय प्रतिक्रिया देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :