🕒 1 min read
Dhananjay Munde । मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच नुकताच धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांचे साडू दादा खिंडकरचा (Dada Khindkar) मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आज तो पोलिसांना शरण आला आहे.
यावर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते (Parmeshwar Satpute) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षा (Walmik Karad) मोठा गुंड आहे. जर त्याला धनंजय मुंडेंनी सपोर्ट केला नसता तर तो आज जेलमध्ये असता,” असा खळबळजनक दावा सातपुते यांनी केला आहे.
“दादा खिंडकर गुन्हेगारी लपविण्यासाठी धनंजय देशमुख यांच्या सोबत फिरत आहेत. संतोष देशमुख यांच्यापेक्षा दादा खिंडकरची गंभीर हत्या झाली असती पण मी त्याची हत्या रोखली,” असाही दावा परमेश्वर सातपुते यांनी केला आहे.
“अजित पवार गटाचे नेते अमरसिंह पंडित (Amar Singh Pandit) हे दादा खिंडकरचे आका आहेत. त्यांनीच चार गुन्हे दाखल करू दिले नाहीत. अमरसिंह पंडित यांच्या जीवावर दादा खिंडकर याने आतापर्यंत दादागिरी केली असून त्याला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनला राजकीय नेत्यांनी कॉल केले,” असा आरोप सातपुते यांनी केला आहे.
Parmeshwar Satpute Target Dhananjay Munde
पुढे ते म्हणाले की, “ज्यावेळी दादा खिंडकरने माझ्या घरावर हल्ला केला होता त्यावेळी घराच्या दाराच्या कड्या लावल्या होत्या. त्यामुळे त्या हल्ल्यातून मी वाचलो होतो. त्याला अटक केली नसल्याने त्याची मुजोरी वाढली. त्यामुळे त्याच्यावर मकोका लावावा,” अशी मोठी मागणी परमेश्वर सातपुते यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या :
- “मुंडे 302 च्या गुन्ह्यात आले नाही तर सरकार…” Manoj Jarange Patil यांनी दिला इशारा
- Dhananjay Deshmukh यांचे साडू दादा खिंडकर पोलिसांना शरण, ‘त्या’ व्हिडिओमुळे आला अडचणीत
- Dattatray Gade याच्या वकिलांवर कारवाई होणार? जाणून घ्या नेमकं कारण









