Namdev Shastri । मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी त्यांची पाठराखण केली आहे. यामुळे त्यांना विरोधाचा सामना करावा लागतोय. अशातच आता नामदेव शास्त्री यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
नामदेव शास्त्री यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. नामदेव शास्त्री हे वंजारी आणि मराठा (Maratha) समाजात तेढ निर्माण करत आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी विनंती मराठा कार्यकर्त्यांकडून अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांना करण्यात आली आहे .
तसेच नामदेव शास्त्री यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, जर त्यांनी हे वक्तव्य त्यांनी मागे घेतले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही या निवदेनात करण्यात आली आहे. त्यामुळे आता नामदेव शास्त्री यांच्या भूमिकेकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
Maratha community on Namdev Shastri
इतकेच नाही तर नामदेव शास्त्री यांच्यावर आता राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख ह. भ. प. विठ्ठल आबा मोरे (Aaba More) यांनी पत्रकार परिषद घेत निशाणा साधला आहे. “शास्त्री बुवा तुम्ही हत्येचे समर्थन करता का? आरोपी फरार असताना शास्त्री बुवांनी त्यांना छुपा आश्रय होता का याची चौकशी का होऊ नये? जर दोन तास धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करून त्यांची मानसिकता समजून घेतली आणि त्यांना दुःख झाले, तर संतोष देशमुख यांच्या परिवाराची मानसिकता काय असेल याचे उत्तर बुवा देणार का?” असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :