Share

इंग्लंडचा धुव्वा उडवणारा Abhishek Sharma कोणत्या संघाकडून खेळणार IPL? जाणून घ्या..

Abhishek Sharma । यंदा सुरु होणाऱ्या IPL च्या (IPL 2025) सामन्यांमध्ये अनेक नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरकीडे विशेष लक्ष असणार आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड आणि टीम इंडिया यांच्यात झालेल्या 5 व्या टी -20 सामन्यात टीम इंडियाच्या अभिषेक शर्माने चांगली कामगिरी केली. त्याने एकूण 54 चेंडूंचा सामना करत तब्बल 135 धावा केल्या. यामुळे … Read more

by MHD

Published On: 

Abhishek Sharma will play from Sunrisers Hyderabad team in IPL 2025

Abhishek Sharma । यंदा सुरु होणाऱ्या IPL च्या (IPL 2025) सामन्यांमध्ये अनेक नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरकीडे विशेष लक्ष असणार आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड आणि टीम इंडिया यांच्यात झालेल्या 5 व्या टी -20 सामन्यात टीम इंडियाच्या अभिषेक शर्माने चांगली कामगिरी केली. त्याने एकूण 54 चेंडूंचा सामना करत तब्बल 135 धावा केल्या. यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या खेळीमुळे त्याने एक इतिहास निर्माण केला. या कामगिरीसह अभिषेक शर्मा सर्वात वेगाने शतक ठोकणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. याअगोदर डेविड मिलर (David Miller) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी 35 चेंडूत शतक केले आहे. दरम्यान, इंग्लंड आणि टीम इंडियामध्ये झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 150 धावांनी धुव्वा उडवला.

आयपीएल 2025 मध्ये, अभिषेक शर्मा सनरायझर्स हैदराबादच्या वतीने खेळताना दिसेल. तो सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी फ्रेंचायझीने 14 कोटी रुपये राखून आपल्या संघात दाखल केले आहे.

सनरायझर्स हैदराबादसाठी अभिषेक शर्माने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 61 सामने खेळले आहेत. त्याची सरासरी 25.50 आणि 155.24 चा स्ट्राइक रेट असून त्याने 1377 धावा केल्या आहेत. त्याने मागील हंगामात, 204.22 च्या स्ट्राइक दराने 484 धावा केल्या आहेत. त्यामुळे तो यंदाच्या मोसमात देखील अशीच चमकदार कामगिरी करणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Abhishek Sharma in IPL 2025

दरम्यान, आयपीएल ही जगातील मोठी क्रिकेट लीग असून आयपीएलची मीडिया व्हॅल्यू 6.2 बिलियन युएसडी डॉलर्स म्हणजेच सुमारे 48000 कोटी इतकी आहे. त्याशिवाय जगातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स लीगमध्ये नॅशनल फुटबॉल लीगनंतरची ही दुसऱ्या क्रमांकाची लीग आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही