Share

“कृष्णा आंधळेने पुरावे नष्ट केल्यास…”; Dhananjay Deshmukh यांनी प्रशासनाला धरले वेठीस

by MHD
Dhananjay Deshmukh, Krushna Andhale

Dhananjay Deshmukh । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना अजूनही न्याय मिळाला असून आरोपींना फाशीची शिक्षा करावी, अशी मागणी सर्वस्तरातुन केली जात आहे. यामुळे पोलीस यंत्रणेवर दबाव वाढत चालला आहे. तसेच राज्याचे वातावरणही बदलले आहे.

पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी एकूण 8 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चौकशी सुरु आहे. यातील नववा आरोपी म्हणजे कृष्णा आंधळे (Krushna Andhale) अजूनही पोलिसांना गुंगारा देतच आहे. यामुळे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रशासनावर निशाणा साधला आहे.

“फरार कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडत नाही. मागील 2 वर्षांपासून फरार असताना पोलिसांनी दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे फरार असूनही तो पक्ष कार्यालयात यायचा. त्याला लवकरात लवकर अटक केली नाही तर तो संतोष देशमुख हत्याप्रकरणातील पुरावे नष्ट करेल. जर त्याने पुरावे नष्ट केले तर त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची तातडीने दखल घ्यावी,” अशीही मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.

Dhananjay Deshmukh on Krushna Andhale

एकंदरीतच धनंजय देशमुख यांच्या दाव्यामुळे पोलीस यंत्रणेवर आणखी दबाव आला असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाला दोन महिने होत आले तरी कृष्णा आंधळे हा पोलिसांना का सापडत नाही? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच धनंजय देशमुख यांच्या मागणीची दखल देवेंद्र फडणवीस घेतील का? याकडे देशमुख कुटुंबियांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Dhananjay Deshmukh । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना अजूनही न्याय मिळाला असून आरोपींना फाशीची शिक्षा करावी, अशी मागणी सर्वस्तरातुन केली …

पुढे वाचा

Crime Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now