Share

कृष्णा आंधळेला कोणी लपवलं? Manoj Jarange Patil यांनी थेट नावच सांगितलं

by MHD
Manoj Jarange Patil claims that Dhananjay Munde hide Krishna Andhale

Manoj Jarange Patil । संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) जवळपास दोन महिने होत आली तरी अजूनही यातील एक आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठा दबाव वाढत चालला आहे. अशातच आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे.

“कृष्णा आंधळे हा एक नाही तर अनेक आहेत. खंडणी घेऊन पैसे जमावण्यासाठी त्याला मजा वाटली. तो कुठेही जाणार नाही. त्याला मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीच लपवून ठेवले आहे,” असा खळबळजनक दावा मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

“निवडणूकीपूर्वी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड (Walmik Karad) मला रात्री 2 वाजता भेटायला आले होते. त्यांचे मला 8 दिवसांपासून फोन येत होते. मी झोपलो होतो त्यांनी आत येऊन मला वाल्मिक कराडची ओळख करून दिली. त्यावेळी मी त्यांना हर्व्हेस्टरचे पैसे बुडवणार असेही सांगितले होते. लक्ष राहुद्या असं सांगत जाताना माझ्या पाया पडले,” असा खुलासा देखील जरांगे पाटील यांनी केला आहे.

Manoj Jarange Patil on Dhananjay Munde

तसेच त्यांनी आरक्षणावरून सरकारला इशारा दिला आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तुम्हाला माणुसकी नाही का? मराठ्यांचे मुडदे पडू देऊ नका. तुम्हाला मराठा समाजाची दयामाया येत नाही. तुमच्यामुळेच आमच्या आत्महत्या होत आहेत,” असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Manoj Jarange Patil । संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) जवळपास दोन महिने होत आली तरी अजूनही यातील …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News