Share

…तर Dhananjay Munde यांनाही भगवानगडाचे महंतपद देणार का? वारकरी संप्रदायाचा संतप्त सवाल

Dhananjay Munde । मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. विरोधकांकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी त्यांची पाठराखण केली आहे. यामुळे त्यांना विरोधाचा सामना करावा लागतोय. नामदेव शास्त्री यांच्यावर आता राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख ह. भ. प. विठ्ठल आबा … Read more

by MHD

Published On: 

Varakari Sampraday slams on Namdev Shastri supports to Dhananjay Munde

Dhananjay Munde । मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. विरोधकांकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी त्यांची पाठराखण केली आहे. यामुळे त्यांना विरोधाचा सामना करावा लागतोय.

नामदेव शास्त्री यांच्यावर आता राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख ह. भ. प. विठ्ठल आबा मोरे (Aaba More) यांनी पत्रकार परिषद घेत निशाणा साधला आहे. “शास्त्री बुवा तुम्ही हत्येचे समर्थन करता का? आरोपी फरार असताना शास्त्री बुवांनी त्यांना छुपा आश्रय होता का याची चौकशी का होऊ नये? जर दोन तास धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करून त्यांची मानसिकता समजून घेतली आणि त्यांना दुःख झाले, तर संतोष देशमुख यांच्या परिवाराची मानसिकता काय असेल याचे उत्तर बुवा देणार का?” असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला.

“धनंजय मुंडे यांच्यामध्ये संत दिसत असेल तर भगवानगडाचे महंतपद त्यांना देणार का? शास्त्री बुवा खुनी, भ्रष्टाचारी, खंडणीखोरांसाठी धावून आले, याचा अर्थ खंडणीतील वाट त्यांना मिळाला असे का समजू नये. दोन समाजाला समोरासमोर लढा असे सांगणे भगवानगडाच्या महंताला शोभते का?” असा संतप्त सवाल देखील मोरे यांनी उपस्थित केला आहे.

Aaba More on Namdev Shastri Maharaj

दरम्यान, वारकरी संप्रदायाने नामदेव शास्त्री यांना अनेक सवाल उपस्थित करत त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. यावर आता नामदेव शास्त्री काय प्रत्युत्तर देतात? याकडे आता लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही