Walmik Karad । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागल्याचेही दिसत आहे. अशातच या प्रकरणी (Santosh Deshmukh murder case) भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे.
“वाल्मिक कराड याने 15 आणि 16 डिसेंबर रोजी दिंडोरी आश्रमात मुक्काम केला होता आणि तो 17 डिसेंबरला दिंडोरी आश्रमातून निघाल्यानंतर नाशिक शहरातील शरणपूर रोड येथे हस्तरेषातज्ञांकडे भविष्य पाहण्यासाठी गेला होता. खंडण्या मागायच्या आणि इतरांचे आयुष्य उद्धवस्त करायचे. स्वतःच भविष्य बघायला एखाद्याकडे जायचं ही क्रूर मानसिकता आहे,” असे वक्तव्य तृप्ती देसाई यांनी केले आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, “नाशिकच्या पोलिसांनी 17 डिसेंबरचे शरणपूर रोडचे सीसीटीव्ही तपासून घ्यावेत. तसेच तो ज्यांच्याकडे गेला होता ते सीसीटीव्हीमध्ये दिसले की त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा,” अशीदेखील मागणी तृप्ती देसाई यांनी यावेळी केली आहे.
Trupti Desai on Walmik Karad
दरम्यान, यापूर्वीही तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडवर निशाणा साधला होता. अशातच आता त्यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक खुलासा करत मोठा दावा केला आहे. यामुळे मोठी उडाली आहे. कराड हा खरोखर भविष्य पाहण्यासाठी गेला होता का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :