Share

Walmik Karad च्या अडचणी पुन्हा वाढल्या, कोर्टाने घेतला मोठा निर्णय

by MHD
Walmik Karad custody extended for next 14 days

Walmik Karad । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणामुळे वाल्मिक कराड हा चांगलाच अडचणीत सापडला आहे. अशातच आता कराडच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. (Santosh Deshmukh Murder Case)

22 जानेवारी रोजी कराडला बीड विशेष न्यायालयाकडून 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. पण आज या कोठडीची मुदत संपत आहे. अशातच कराडला आज कोर्टात हजर न करताच त्याच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे.

दरम्यान, आज बीड कारागृहाकडून जेल वॉरंट कोर्टाला पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर कराडच्या कोठडीत कोर्ट आणखी 14 दिवसांची वाढ करेन. याच कारणामुळे आज कराड किंवा त्याच्या वकिलाकडून कोणतीही सुनावणी होणार नाही. कोर्टाच्या या निर्णयामुळे कराडच्या अडचणीत भर पडली आहे.

Walmik Karad custody extended

कालच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी कराडबाबत एक खळबळजनक खुलासा केला आहे. “वाल्मिक कराडने 15 आणि 16 डिसेंबर रोजी दिंडोरी आश्रमात मुक्काम केला होता आणि तो 17 डिसेंबरला दिंडोरी आश्रमातून निघाल्यानंतर नाशिक शहरातील शरणपूर रोड येथे हस्तरेषातज्ञांकडे भविष्य पाहण्यासाठी गेला होता,” असा दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Walmik Karad । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणामुळे वाल्मिक कराड हा …

पुढे वाचा

Crime Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now