Sanjay Raut । ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सतत महायुती सरकारवर विविध कारणांवरून निशाणा साधत असतात. यामुळे अनेकदा राजकीय वातावरण देखील ढवळून जात असते. अशातच आता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.
“देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊनही सागर बंगला सोडला नाही. मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान ते अजूनही वर्षा बंगल्यावर (Varsha bungalow) राहायला का गेले नाहीत. याचे उत्तर लिंबू सम्राटने द्यावे,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, “भाजपमध्ये (BJP) अशी चर्चा सुरु आहे की, वर्षा बंगल्यावरील लॉनमध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांची शिंगे पुरली आहेत. आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. पण या बंगल्यावरील कर्मचारी वर्गात चर्चा सुरु आहे. नवीन मुख्यमंत्री टिकू नये म्हणून असे केले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जात नाहीत,” असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut on Devendra Fadnavis
दरम्यान, संजय राऊत यांच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राऊत विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झाला आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस आणि भाजप काय प्रत्युत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या :