Share

Dhananjay Munde यांनी फेटाळले Anjali Damania यांचे आरोप, म्हणाले; “त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी..”

by MHD
Dhananjay Munde denied Anjali Damania Accusation

Dhananjay Munde । सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आज पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर 275 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता मुंडेंनी पलटवार करत दमानियांचे आरोप फेटाळून लावले आहेत. (Dhananjay Munde PC)

“मी कृषी मंत्री असताना साहित्य खरेदीबाबत आरोप करण्यात आले आहेत. पण हे सर्व आरोप त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणे आणि धांदात खोटे आरोप करणे, यापलिकडे यात काही नाही असे प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

पुढे ते म्हणाले की, “मार्च 2024 मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया ही संपूर्ण पणे नियमात आणि शासनाच्या धोरणाला अनुसरून राबवण्यात आली आहे. मागील 50 दिवसांपासून सतत त्या माझ्यावर विविध आरोप करत आहेत. पण त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही. खोटे आरोप करून स्वत:ची प्रसिद्ध करायची,” असा आरोप मंत्री मुंडे यांनी केला आहे.

Dhananjay Munde on Anjali Damania

“माझ्यावरील मीडिया ट्रायलला (Media trial) आज 58 वा दिवस आहे. अंजली ताई शेतकरी आहे की मला नाही माहीती नाही. पण शेतीपूर्वी काही मशागत करावी लागते,” असा चिमटा मुंडे यांनी काढला आहे. दरम्यान, आता मुंडेंच्या आरोपांनंतर दमानिया काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

Dhananjay Munde । सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आज पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर 275 कोटींचा …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now