Share

Dhananjay Munde यांच्या अडचणी वाढल्या, कृषीमंत्र्यांनी दिले कारवाईचं आश्वासन

by MHD
Dhananjay Munde problems increased due to scam in crop insurance scheme

Dhananjay Munde । मागील काही दिवसांपासून सातत्याने धनंजय मुंडे यांचा राजीनामा विरोधक मागत आहेत. यामुळे मुंडेंच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. अशातच आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संसदेत पीकविमा योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला. यावर स्वतः महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत (Crop Insurance Scheme) तब्बल 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती दिली आहे. यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Fraud in Crop Insurance Scheme)

यावरून सुप्रिया सुळे यांनी केंद्रिय कृषीमंत्र्यांना चांगलेच घेरले. “जर केंद्रिय कृषीमंत्र्यांना याबाबत माहिती होती तर कारवाई करणार का?” असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला. त्याला उत्तर देत असताना केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी याबाबत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन दिले आहे.

Crop insurance scheme fraud

दरम्यान, पीकविमा योजनेतील घोटाळ्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जर या घोटाळ्यात मुंडेंचे नाव समोर आले तर त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ शकते, असा दावा सध्या राजकीय वर्तुळातून केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Dhananjay Munde । मागील काही दिवसांपासून सातत्याने धनंजय मुंडे यांचा राजीनामा विरोधक मागत आहेत. यामुळे मुंडेंच्या अडचणीत मोठी भर पडली …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now