Share

“थोडं धाडस दाखवुन..”; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून Rohit Pawar यांची मोठी मागणी

by MHD
Rohit Pawar demanded Dhananjay Munde resignation

Rohit Pawar । मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या दिवसेंदिवस अडचणीत भर पडत चालली आहे. विरोधकांकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आता शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनीदेखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

“देशमुख परिवारासोबत जी घटना झाली, त्यामध्ये कोणत्या नेत्याचा हात होता किंवा नव्हता हा वेगळा विषय आहे. पण या प्रकरणात नैतिकता दाखवायला हवी. यापूर्वी आर. आर. आबा, अजित पवार आणि विलासराव देशमुख यांनीदेखील नैतिकतेचा विचार करून राजीनामा दिला होता. त्यामुळे थोडेसे धाडस दाखवून मुंडेंनी देखील राजीनामा द्यावा,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

आजच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. धनंजय मुंडे यांच्यावर मकोका आणि 302 चा गुन्हा दाखल करा,” अशीही मागणी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे.

इतकेच नाही तर पीक विमा योजनेत झालेल्या घोटाळ्याची देखील चौकशी होणार असल्याचे आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिले आहेत. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. इतके आरोप होऊनही मुंडे यांनी अजूनही राजीनामा का दिला नाही? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही राजीनाम्यासाठी राजकीय दबाव वाढला जात असताना ते राजीनामा का घेत नाहीत? असा सवाल अनेकांना पडला आहे.

Rohit Pawar on Dhananjay Munde

दिवसेंदिवस राजीनाम्याच्या मागणीवरून वाढत चाललेला राजकीय दबाव आणि नैतिकतेचा विचार करून धनंजय मुंडे देखील आपल्या राजीनाम्याचा विचार करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या :

Rohit Pawar । मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या दिवसेंदिवस अडचणीत भर पडत चालली आहे. विरोधकांकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now