Share

अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायला Dhananjay Munde यांना अब्रू आहे? – पाटील

Anjali Damania Bhaiya Patil Vijay Kumbhar Vikas Lawande Karuna Munde Vs Dhananjay Munde

पुणे । सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्यावर भ्रष्टचाराचे आरोप केले आहेत. मुंडे कृषिमंत्री असताना 275 कोटींचा घोटाळा त्यांनी केला असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. यावर मुंडेंनी आरोपाचे खंडन करत, “अंजली दमानिया माझ्यावर खोटे व बेछूट आरोप करत आहेत. कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरु झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांच्यावर फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

यावर दमानिया म्हणाल्या “धनंजय मुंडे आपल्याला अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा असेल तर आपण खुशाल करा, ह्यात तुमच्यावरच कोर्ट ताशेरे ओढेल ह्यात मला काडीमात्र शंका नाही. मी वकील पण लावणार नाही, स्वतः ही केस हायकोर्टात लढेन.” असे अंजली दमानिया म्हणाल्या.

Dhananjay Munde यांना स्वतःची काय अब्रू आहे?

दरम्यान, यावर सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. ते X वर लिहितात, “धनंजय मुंडे हे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर हायकोर्टात अब्रू नुकसानीचा दावा टाकणार अशा बातम्या मी पाहिल्या.. अब्रू नुकसानीचा दावा कोण करतंय..?? धनंजय मुंडे.. ज्याच्यावर त्याच्या स्वतःच्या मेहुणीने बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता. तसेच त्याच्या एकमेव मुलाची आई करुणा मुंडे ( Karuna Munde ) हिच्यावर तो अन्याय करतो, तीला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलात पाठवतो. तो? अशा धनंजय मुंडे ला स्वता:ची काय अब्रू आहे? तर त्याने इतरांवर अब्रू नुकसानी दावा दाखल करावा..”

मिडिया ट्रायल म्हणून दुर्लक्ष करणे योग्य नाही.

पुण्यातील RTI कार्यकर्ते विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी मंत्री Dhananjay Munde यांच्यावर टीका केली आहे. ते X वर लिहितात. “धनंजय मुंडे आपण ज्या पेशामध्ये आहात त्यात आरोप प्रत्यारोप होणारच, त्याकडे मिडिया ट्रायल म्हणून दुर्लक्ष करणे योग्य नाही. अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर समर्पक उत्तरे देणे हा त्यावरील उपाय आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे, केंद्र सरकारी कंपन्यांना कामे, निविदा देणे किंवा दिल्याचेभासवण्याचा तसेच डीबीटी मधून काही वस्तू वगळून त्यांची निविदा काढण्याचा खेळ महाराष्ट्रात बराच काळ सुरू आहे. या खेळात तरबेज असणारे ठेकेदार मंत्रालयात राजरोसपणे वावरताना दिसतात.”

१.निविदा निघण्यापूर्वीच संपूर्ण रक्कम आधीच दिली गेली होती.

२.कच्चा माल विकत घेण्यासाठी १६ मार्च रोजी पैसे देण्यात आले निविदा मात्र ३० मार्च रोजी काढण्यात आली.

३. बॅटरी स्पेअरचे पैसे २८ मार्चला देण्यात आले, तर त्यांची निविदा ही ५ एप्रिल रोजी काढण्यात आली.

४. कापूस साठवणुकीच्या बॅगचे पैसे देखील १६ मार्चला देण्यात आले तर त्याची निविदा मात्र महिनाभरानंतर निघाली.

५. ⁠शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून देण्याचे केंद्र सरकारचे आदेश धाब्यावर बसवत विविध योजनांचे पैसे डीबीटी मार्फत न देता उपकरणांच्या खरेदीसाठी निविदा काढण्यात आली. हे आरोप खरे आहेत की नाही? ठाम उत्तर द्या. 

Walmik Karad भविष्यात कोर्टातून निर्दोष सुटेल

शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे म्हणतात, ”देवेंद्र फडणवीस ,अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात पूर्ण एकोपा व एकजूट आहे. त्यांच्यात कसलेही मतभेद नाहीत हे सर्वांनी लक्षात ठेवावे. आणि वाल्मीक कराड हा तिघांनाही हवा आहे. वाल्मीक कराड भविष्यात कोर्टातून निर्दोष सुटेल अशी व्यवस्था होईल.

महत्वाच्या बातम्या

अब्रू नुकसानीचा दावा कोण करतंय..?? Dhananjay Munde यांच्यावर स्वतःच्या मेहुणीने बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता. अशा धनंजय मुंडे यांना स्वतःची काय अब्रू आहे? असा आरोप पाटील यांनी केला.

Mumbai Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now