छत्रपती संभाजीनगर, दि.४( Exam Result )- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र अर्थात GCC- TBC डिसेंबर -२०२४ मधील परीक्षा दि.९ ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल दि.४ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येत आहे. परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना परिषेदच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर सायंकाळी ५ वाजेनंतर उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांना गुणपत्रकाची ऑनलाईन प्रिंट घेता येईल.
विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे, गुणपत्रके डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन स्वरुपात संबंधित संस्थांच्या लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात येतील. प्रमाणपत्रांची छपाई संस्थांनी कलर प्रिंटद्वारे १०० जीएसएम कागदावर करुन विद्यार्थ्यांना वितरीत करावे. संबंधित विद्यार्थ्यांस सॉफ्टकॉपी PDF स्वरुपात देण्यात यावी. जेणे करुन विद्यार्थ्यांना भविष्यात प्रमाणपत्राच्या आवश्यकतेनुसार प्रमाणपत्र कलर प्रिंटद्वारे १०० जीएसएम (GSM) कागदावर छपाई करुन घेता येईल. संस्थांनी संबंधित विद्यार्थ्यांस प्रमाणपत्र, गुणपत्रके वितरीत केलेली पोहोच दप्तरी जतन करुन ठेवावी.
ज्या परिक्षार्थिंना गुणपडताळणी करावयाची असेल वा उत्तर पत्रिकेच्या छायांकीत प्रती हव्या असतील त्यांनी निकाल जाहीर झाल्या दिनांकापासून १० दिवसांत गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकीत प्रतीसाठी संस्थेतून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुणपडताळणीसाठी प्रती विषय १०० रुपये प्रमाणे व छायाप्रतीसाठी मिळण्यासाठी प्रती विषय ४०० रुपये याप्रमाणे रक्कम ऑनलाईन पद्धतीने दि.१३ फेब्रुवारी पर्यंत भरावे.गुणपडताळणी व छायाप्रती प्राप्त झाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी कार्यालयीन पाच दिवसात प्रती विषय ६०० रुपयेप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरुन अर्ज करावेत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे च्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे. याबाबतच्या सविस्तर सूचना परिषेदच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या