धनंजय मुंडेंच्या मदतीला धावले Laxman Hake, म्हणाले; “अंजली दलालिया…”

by MHD
Laxman Hake targeted Anjali Damania

Laxman Hake । काल पत्रकारपरिषदेदरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. त्यानंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनीही त्यांच्यावर टीका केली. अशातच आता मुंडेंच्या मदतीला ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके धावून आले आहेत.

“अंजली दमानिया यांचे नाव अंजली दलालिया पाहिजे होते. राज्यातील ओबीसी (OBC) नेत्यांविरोधात षडयंत्र रचले जात असून या समाजाच्या मंत्र्याला मीडिया ट्रायलद्वारे धमकावण्याचं काम होत असेल तर या राज्यातील ओबीसी आणि बहुजन बांधव ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील. मुंडेंवर आरोप आणि टार्गेट करण्यामागे मोठे षडयंत्र आहे,” असा आरोप हाके यांनी केला.

पुढे ते म्हणाले, “निवडक नेत्यांची प्रकरणं उकरुन काढून त्यांना राजकारणातून संपवायच, हा दमानिया यांचा एककलमी कार्यक्रम आहे. राज्यात त्यांनी जी प्रकरणं उपस्थित केली, त्यांच पुढे काय झालं हे महाराष्ट्राला माहीत आहे. दमानिया या फक्त मीडियात स्पेस शोधण्याचे काम करतात,” असा दावा हाके यांनी केला.

“धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी जरांगेंच्या नादी लागू नये. संतोष देशमुख यांच्या हत्येचे राजकारणासाठी भांडवल करण्यात येत आहे. देशमुख जर जरांगेंच्या नादी लागले तर या घटनेचे गांभीर्य कमी होऊ शकते,” असे हाके म्हणाले.

Laxman Hake on Anjali Damania

दरम्यान, यापूर्वी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेतली होती, पण ते प्रकरण नामदेव शास्त्रींच्या अंगलट आले. त्यांनंतर आता लक्ष्मण हाके पुन्हा ओबीसी जातीचे राजकारण करत धनंजय मुंडे यांची पाठराखण करत असल्याचे चित्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Laxman Hake । काल पत्रकारपरिषदेदरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर चांगलाच निशाणा …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now