Sarangi Mahajan । बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून (Santosh Deshmukh murder case) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राजकीय वर्तुळातून केली जात आहे. राजीनाम्यासाठी त्यांच्यावर राजकीय दबाव वाढला जात आहे, अशा चर्चा देखील सुरु आहेत. अशातच आता पुन्हा एकदा मुंडेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
“धनंजय मुंडे यांनी स्वतःचं पद वाचवण्यासाठी आटापिटा लावला असून त्यांनी जनतेचा रोष पाहून राजीनामा द्यायला पाहिजे. माझ्या 36 गुंठ्यांचा घोटाळा झाला आहे. त्यांना माझी 36 गुंठे जमीन घेऊन काय मिळणार होत? अंजली दमानिया (Anjali Damania) यांना बदनामिया म्हणून अखेर मुंडेंनी आपलं खरं रूप दाखवलं आहे. आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,” अशी मागणी धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी केली आहे. (Sarangi Mahajan on Dhananjay Munde)
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजकीय वातावरण चांगलेच पेटले असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही त्यांचा राजीनामा घ्यावं यासाठी राजकीय दबाव टाकला जात आहे, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Sarangi Mahajan vs Dhananjay Munde
तसेच मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात अनेक बाबींची माहिती लपवली असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी प्रतिवादींसह मुंडे आणि इतर उमेदवारांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :