बीड । भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे सातत्याने अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच पेटून उठले आहे. मुंडेंवरही राजीनाम्यासाठी राजकीय दबाव वाढला जात आहे.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आष्टी तालुक्यातील साठवण तलाव प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन बोलताना फडणवीसांसमोरच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
“काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिला असल्याने या जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली आहे. संतोष देशमुख प्रकरणात (Santosh Deshmukh murder case) देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली कणखर भूमिका जनतेला आवडली आहे. मी कोणालाच सोडणार नाही, असे तुम्ही म्हणता. जनतेला तुमच्यावर विश्वास आहे. आता बीड जिल्ह्यातील राख माफिया, वाळू माफिया आणि भूमाफियांनाही मकोका लागला पाहिजे,” अशी मागणी धस यांनी केली आहे.
Suresh Dhas on Dhananjay Munde
पुढे ते म्हणाले की, “2019 पासून कटकारस्थान करुन माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न झाला. पण त्यावेळी फडणवीस दत्त म्हणून माझ्या पाठीशी उभे राहिले. आपण सभागृहात सांगितले सुरेश धस तुम्हाला 300 कोटी रुपये देतो. लगेचच तुम्ही पैसे दिल्याने बीड जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातील 5 तालुक्याची पाण्याची गरज भागणार आहे. हे केवळ देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात,” असा दावा देखील धस यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :