Eknath Shinde – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा एकाकी; मराठा आरक्षणांवर फडणवीस-पवारांची दांडी

राजेभाऊ मोगल । छत्रपती संभाजीनगर | Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात कधी नव्हे असे मोठे आंदोलन उभे झाल्यानंतर त्याला सामोरे जाण्यासाठी तीन पक्षाचे सरकार असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकट्यालाच तोंड द्यावे लागत आहे. या निमित्ताने ते एकाकी पडलेत का? अशीही चर्चा आता सुरू झालेली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. कोपर्डीतील ( Koprdi ) घटनेनंतर मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने ५४ लक्ष वेधून घेणारे मोर्चे काढले. मात्र, या मोर्चालाही तत्कालीन सरकारने फारसे गांभीर्याने घेतल्याचे बघायला मिळाले नाही. त्यानंतर त्या सरकारबद्दल संतापही व्यक्त झालेला आहे. मागील काही महिन्यांपासून पुन्हा एकदा मराठा समाजाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

याची सुरुवात मात्र, मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange ) या प्रामाणिक तरुणांच्या नेतृत्वाखाली केली आहे. जरांगे पाटील यांनी आपले हे आंदोलन एखाद्या शहरातून नव्हे तर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या खेडेगावातून केली. या आंदोलनादरम्यान त्यांच्यातला प्रामाणिकपणा दिसून आल्याने मराठा समाजाने त्यांच्यावर जीव ओतून टाकावा, असा विश्वास टाकत आंदोलनात उडी घेतली.

आंदोलन व्यापक होत असतानाच पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याने वातावरण तापून निघाले. यानंतर राज्यातील महत्त्वाचे नेते आंदोलकांना भेटून आपलं समर्थन असल्याचे सांगत पाठिंबा देऊन गेले. मात्र, मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी येण्यासाठी वेळ लागला.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाल्या नंतर गृहमंत्री म्हणून सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnvis ) यांनी येणे गरजेचे होते. मात्र समाजाचा रोष पाहता त्यांनी आंदोलन स्थळी येण्याची हिम्मत दाखवली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा करणे, सांत्वन करणे, प्रश्न जाणून घेणे, सामोरे जाणे टाळले.

शेवटी मुख्यमंत्र्यांनाच पुढे येऊन अंतरवाली सराटी गाठावी लागली. त्यांच्या या दौऱ्यादरम्यानही अनेक गोष्टी घडल्या आणि मुख्यमंत्री एकाकी पडले अशी चर्चा ऐकायला मिळाली.

आरक्षणाचा प्रश्न सोडविला जाईल, त्यासाठी आम्हाला एक महिन्याचा अवधी द्या, असे म्हणत हे आंदोलन थांबविण्याची विनंती करण्यात आली. मात्र, आंदोलन न थांबवता तीस दिवस काय मागता ४९ दिवस देतो, पण आम्हाला आरक्षण द्या, अशी अट जरांगे पाटील ( Manoj Jarange ) यांनी ठेवली. या ४० दिवसाच्या कालावधीत फार समाधानकारक गोष्टी घडल्या नाहीत.

त्यामुळे आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्यात तुम्ही आमच्या गावात यायचं नाही म्हणजे केवळ अंतरवाली नव्हे तर राज्यभर नेत्यांना गावबंदी करण्यात आली. या टप्प्याने नेत्यांची कोंडी झाली. शिवाय, काही ठिकाणी गाड्या फोडणे, गाड्या पेटवणे असेही प्रकार घडले. आंदोलन पेटले असताना ते हाताळण्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनाच पुढे यावे लागत आहे.

त्यांच्यासोबतचे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही शिलेदार त्यांच्यासोबत नाहीत. फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत तर दुसरे अजित पवार हे उपमुख्यमंत्री तसेच मराठा समाजातील अत्यंत महत्त्वाचे नेते मानले जातात, असे हे दोघेही वेगवेगळ्या कारणाने आज मुख्यमंत्र्यांसोबत दिसले नाहीत.

अजित पवार यांना डेंगू झाल्याचं ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले तर देवेंद्र फडणवीस हे छत्तीसगड येथे पक्षाच्या कार्यक्रमासाठी गेले. त्यामुळे राज्यातील पेटलेले आंदोलन हाताळण्याची जबाबदारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यावरच आली आहे. यानिमित्ताने ते एकाकी पडले आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.