Manoj Jarange | मनोज जरांगेची तब्येत अत्यंत ढसाळली; शिंदे-फडणवीस जरांगेंचा जीव वाचवणार का?

Manoj Jarange | जालना: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. उपोषणाच्या सहाव्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत ढासळलेली असून त्यांना बोलताना सुद्धा त्रास होत आहे. अशात जीव गेला तरी चालेल पण मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं … Read more

Published On: 

Manoj Jarange | जालना: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे.

उपोषणाच्या सहाव्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत ढासळलेली असून त्यांना बोलताना सुद्धा त्रास होत आहे. अशात जीव गेला तरी चालेल पण मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

त्याचबरोबर जरांगे यांनी औषध आणि सलाईन घेण्यास देखील नकार दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलन अत्यंत आक्रमक झाले आहे.

Manoj Jarange’s health deteriorated

मराठा समाजाचं आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन दिवसेंदिवस पेटत चाललं आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे.

तर जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत नेत्यांना गावात घेणार नाही, अशी भूमिका अनेक ग्रामस्थांनी स्पष्ट केली आहे. अशात मनोज जरांगे यांची प्रकृती देखील खालावली आहे.

तर दुसरीकडे आज मराठा उपसमितीची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणावर तोडगा निघणार का? मराठ्यांना आरक्षण देऊन शिंदे-फडणवीस सरकार मनोज जरांगे यांचा जीव वाचवणार का? अशा चर्चा आता राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

Manoj Jarange sister commented on Maratha Reservation

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. आज उपोषण स्थळी त्यांची बहीण रेखा पाटील दाखल झाली आहे. यावेळी बोलत असताना त्या म्हणाल्या, “मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मराठा समाजाने राज्य शासनाला चाळीस दिवसाचा वेळ दिला होता.

मात्र, यादरम्यान राज्य सरकारने काहीच केलं नाही. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी त्यांना पुरावे हवे होते. आता त्यांना ते देखील मिळाले आहे. मात्र, सरकारने माझ्या भावाचा जीव घ्यायचं ठरवलं आहे. सरकारने सगळं बंद करून माझ्या भावाचा जीव वाचवायला हवा.”

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही