🕒 1 min read
Maratha Reservation | जालना: मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आमरण उपोषणाला बसले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे.
उपोषणाच्या सहाव्या दिवशी त्यांची तब्येत अत्यंत बिघडलेली आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी औषध घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
अशात मनोज जरांगे यांची बहिण (रेखा पाटील) आज उपोषण स्थळी दाखल झाली आहे. यावेळी बोलत असताना त्या अत्यंत भावूक झालेल्या असून त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे.
Manoj Jarange sister commented on Maratha Reservation
आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 6 वा दिवस आहे. उपोषणाच्या सहाव्या दिवशी त्यांची बहीण आज उपोषण स्थळी त्यांच्या भेटीसाठी आली आहे.
यादरम्यान त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारला माझ्या भावाचा जीव घ्यायचाच आहे, असं रेखा पाटील यांनी म्हटलं आहे.
रेखा पाटील म्हणाल्या, “मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला चाळीस दिवसांचा कालावधी दिला होता. परंतु, या दरम्यान राज्य सरकारने काहीच केलं नाही.
या चाळीस दिवसांमध्ये त्यांनी एक बैठक सुद्धा घेतली नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांना पुरावे हवे होते. आता त्यांच्याकडे पुरावे देखील आहे.
परंतु, सरकारने माझ्या भावाचा जीव घ्यायचं ठरवलं आहे. माझ्या भावाचा बीपी लो होत चालला आहे. त्याचबरोबर त्यांना उपचाराची गरज आहे.
वेळेवर उपचार नाही मिळाले तर माझ्या भावाला काहीही होऊ शकतं. राज्य सरकारने सगळं बंद करून माझ्या भावाचा जीव वाचवायला हवा.”
दरम्यान, मराठा समाजाचं (Maratha Reservation) आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं, यासाठी राज्यात मराठा तरुण आत्महत्या करताना दिसत आहेत.
दुसरीकडे अनेक ग्रामस्थांनी नेत्यांसाठी गाव बंदी केली आहे. अशात आज मराठवाड्यातील आमदारांना जाग आलेली असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) तोडगा काढण्याऐवजी नुसत्या पत्रकार परिषद घेत असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फक्त आश्वासन देत आहे, असं मराठा समाजाचं म्हणणं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मराठ्यांचे जीव गेल्यानंतर आमदारांना जाग आली? आज घेणार CM शिंदेंची भेट
- Weather Update | राज्यातील तापमानात घसरण सुरू, लागली थंडीची चाहूल
- BJP vs CONGRESS – ‘५० कोटी अन् मंत्रिपद…भाजपची काँग्रेस आमदारांना ऑफर’
- Maratha Reservation | मराठा समाज आक्रमक; नेत्यांचं घराबाहेर पडणं झालं कठीण
- Maratha Reservation | दुष्काळ जगू देत नाही, आरक्षण शिकू देत नाही म्हणतं मराठा तरुणाने केली आत्महत्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











