Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी झटत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहे.
मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. उपोषणाच्या सहाव्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत खालवली आहे. अशात मनोज जरांगे यांनी औषध, पाणी घेण्यास देखील नकार दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील आमदार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार आहे.
Santosh Bangar will discuss Maratha reservation with Eknath Shinde
मराठा समाजाचं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. जोपर्यंत आरक्षण (Maratha Reservation) मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, असं मराठा समाजाने स्पष्ट केलं आहे.
मनोज जरांगे यांची प्रकृती जसजशी खालावत आहे, तसंतसा मराठा समाज आक्रमक होत आहे. याच पार्श्वभूमीवर संतोष बांगर मराठवाड्यातील आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे.
सह्याद्री अतिथी गृहात ही बैठक होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशात मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत राज्यातील बहुतांश गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी अनेक मराठा तरुण आत्महत्या करताना दिसत आहे. अशात मराठवाड्यातील आमदार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे.
गाव बंदी उठवण्यासाठी आणि आंदोलन थांबवण्यासाठी हे आमदार मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर इतर बैठकांप्रमाणे या बैठकीमध्ये देखील काहीही साध्य होणार नसल्याचं देखील बोललं जात आहे.
दरम्यान, आज (30 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यवतमाळ जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमापूर्वी ‘शासन आपल्या दारी’च्या पोस्टरला काही अज्ञातांनी काळं फसलं आहे.
त्याचबरोबर राज्य सरकारच्या या कार्यक्रमाला मराठा संघटनांकडून (Maratha Reservation) मोठा विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खबरदारी म्हणून कार्यक्रम स्थळी बॅरीगेट्स लावण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात आहे. तर मराठा समाजाचा विरोध असताना एकनाथ शिंदे या कार्यक्रमासाठी येतील का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | राज्यातील तापमानात घसरण सुरू, लागली थंडीची चाहूल
- BJP vs CONGRESS – ‘५० कोटी अन् मंत्रिपद…भाजपची काँग्रेस आमदारांना ऑफर’
- Maratha Reservation | मराठा समाज आक्रमक; नेत्यांचं घराबाहेर पडणं झालं कठीण
- Maratha Reservation | दुष्काळ जगू देत नाही, आरक्षण शिकू देत नाही म्हणतं मराठा तरुणाने केली आत्महत्या
- Maratha Reservation | शिंदे-फडणवीस अजून किती मराठ्यांचे जीव घेणार? आरक्षणासाठी 24 तासात दोन तरुणांची आत्महत्या