Weather Update | राज्यातील तापमानात घसरण सुरू, लागली थंडीची चाहूल

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला देशातून परतीच्या पावसाने माघार घेतली.

तर त्यानंतर नागरिकांना ऑक्टोबर हिटने हैराण करून टाकले होते. अशात आता नागरिकांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे.

आज आणि उद्या महाराष्ट्रावरील हवेचा दाब वाढणार असल्यामुळे तापमानात घसरण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा मिळणार आहे.

The air pressure over the state will increase today and tomorrow

आज आणि उद्या राज्यावरील हवेचा दाब वाढणार आहे. हवेचा दाब वाढला तर तापमानात (Weather Update) घसरण होते. त्यामुळे नागरिकांना ऑक्टोबर हिटपासून दिलासा मिळणार असून राज्यात थंडीची चाहूल लागणार आहे.

तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हवामान अल्पशा प्रमाणात ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

परिणामी उत्तर भारतातील गार वारे दक्षिण दिशेच्या वाहण्यास सुरुवात होऊ शकते. राज्यामध्ये कमाल आणि किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. तर या आठवड्यामध्ये राज्यामध्ये पाऊस पडणार नसल्याचं  हवामान खात्याने म्हटलं आहे.

दरम्यान, या आठवड्यामध्ये पालघर, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 30 ते 34 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला (Weather Update) आहे.

तर या ठिकाणी किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. तर ठाणे आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाचा पारा 18 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.