Maratha Reservation | अजित पवार मराठा समाजापेक्षा मोठे आहे का? शिंदे-फडणवीसानंतर जरांगेंनी पवारांचे कान टोचले

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation | जालना: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं आहे.

मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक गावकऱ्यांनी पुढाऱ्यांसाठी गाव बंदी केली आहे.

अशात अजित पवार (Ajit Pawar) बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी कारखान्याच्या मोळी पूजनाला जाणार होते. परंतु, मराठा समाजाने त्यांच्या येण्यावर बंदी घातली.

याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आपला बारामती दौरा रद्द केला आहे. यानंतर या प्रकरणावर बोलत असताना मनोज जरांगे यांनी अजित पवारांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

Manoj Jarange commented on Maratha Reservation

मनोज जरांगे म्हणाले, “अजित पवारांनी त्यांचा कार्यक्रम रद्द केला आहे. मात्र, अजित पवार काय मराठा समाजापेक्षा मोठे आहेत का? इथं मराठा समाज मोठा आहे.

मराठा समाजाने त्यांना मोठं केलं आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) झटत असलेले त्यांचेच लेकरं आहे. त्यांच्यासाठी अजित पवारांनी कार्यक्रम रद्द केला आहे, याचा त्यांना दुःख झालं आहे का?

मराठा समाजासाठी सत्ताधाऱ्यांसह सर्व विरोधकांनी मुंबईमध्ये एकत्र यावं. त्यानंतर गोरगरीब मराठ्यांसाठी त्यांनी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं. त्यानंतर महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून (Maratha Reservation) देण्यासाठी त्यांनी त्यांची संपूर्ण ताकद लावायला हवी.”

Protesters blocked Monica Rajle’s caravan for Maratha reservation

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार मोनिका राजळे यांना देखील त्यांच्या मतदारसंघात रोखण्यात आलं आहे. मोनिका राजळे आज पाथर्डी येथील खरवंडीमध्ये दाखल झाल्या होत्या.

परंतु, मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा गावाबाहेरच अडवला. त्यानंतर आंदोलकांनी त्यांना मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) विचारणा केली. भाजप आमदाराचा निषेध असो, अशा घोषणा देखील मराठा आंदोलकांनी यावेळी दिल्या.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe