Maratha Reservation | शिंदे- फडणवीसांच्या आडमुठेपणामुळे जनता वेटीस; जनसामान्यांना अजून काय काय बघावं लागणार?

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती.

परंतु, राज्य सरकारने यादरम्यान काहीच निर्णय घेतला नाही. यानंतर मराठा समाज अत्यंत आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने बहुतांश गावांमध्ये पुढाऱ्यांसाठी गाव बंदी केली आहे.

तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांसह पोलीस कर्मचारी देखील आपल्या पदाचा राजीनामा देताना दिसत आहे. मात्र, तरी देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू नसल्याचं दिसत आहे.

राज्य शासन लवकर निर्णय घेत नसल्यामुळे मराठा आरक्षणावरून राज्यातील जनतेला आणखीन काय काय बघावं लागणार आहे? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

Protesters blocked Monica Rajle’s caravan for Maratha reservation

मराठा समाजाचं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळणार नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांनी गावात प्रवेश करू नये, अशी भूमिका अनेक गावकऱ्यांनी मांडली आहे.

अशात भाजप आमदार मोनिका राजळे पाथर्डी येथील खरवंडीमध्ये दाखल झाल्या होत्या. मात्र, मराठा आंदोलकांनी त्यांना त्यांच्याच मतदारसंघातील गावात घेतलं नाही. मराठा आंदोलकांनी गावाबाहेरच त्यांचा ताफा अडवला.

No entry for Ajit Pawar in Baramati for Maratha reservation?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील मराठा आंदोलकांची (Maratha Reservation) झळ बसली आहे. अजित पवार त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी कारखान्याच्या मोळी पूजनाला जाणार होते.

परंतु, मराठा आंदोलकांनी अजित पवारांना गाव बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिस आणि कारखाना संचालक यांनी बैठक घेतली होती.

मात्र, त्यांची बैठक व्यर्थ ठरली आहे. यानंतर मराठा समाज खरंच अजित पवारांना बारामतीत येण्यास रोखू शकतो का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

Shivaji Bhagde resigns for Maratha reservation

मराठा आंदोलनाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळासह पोलिस दलात देखील दिसून आले आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी भागडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

मी मराठा समाजाचा आहे. मी आमच्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. सरकारने लवकरात लवकर माझा राजीनामा आणि मराठा समाजाची (Maratha Reservation) मागणी मंजूर करावी ही नम्र विनंती”, असं शिवाजी भागडे  यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

youth committed suicide for Maratha reservation

दरम्यान, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देत नसल्याने राज्यामध्ये अनेक तरुण आत्महत्या करताना दिसत आहे.

बीड, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आपला जीव दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं,  यासाठी मराठा समाज पेटून उठला आहे.

तरी देखील शिंदे-फडणवीस सरकार मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर तोडगा काढायला तयार नाही. राज्य सरकारच्या या हलगर्जीपणामुळे सामान्य जनतेला अजून काय काय बघावं लागणार आहे? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe