Maratha Reservation | शिंदे-फडणवीस मनोज जरांगेंचा जीव घेणार का? जरांगेंची प्रकृती आणखीन खालावली

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation | जालना: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी ऑक्टोबर महिन्यात मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं होतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीवरून त्यांनी त्यांचं उपोषण मागे घेत राज्य शासनाला या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांची मुदत दिली होती.

या कालावधीमध्ये राज्य सरकारने मराठा आरक्षणावर तोडगा काढला नाही. त्यामुळं ही मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यात उपोषणाला सुरुवात केली आहे.

Manoj Jarange hunger strike continues for Maratha reservation

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली आहे.

आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिला आहे.

त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) देऊन मनोज जरांगे यांचा जीव वाचवावा, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे.

No entry for Ajit Pawar in Baramati for Maratha reservation?

दरम्यान, आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून मराठा समाज अत्यंत आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठ्यांनी पुढाऱ्यांसाठी गाव बंदी केली आहे.

अशात अजित पवारांना त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीत येण्यास मराठा समाजाने गाव बंदी घातली आहे. अजित पवार बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी कारखान्याच्या मोळी पूजनाला आज जाणार आहे.

परंतु, मराठा समाज अजित पवारांच्या विरोधात उभा राहिला आहे. अजित पवारांना बारामतीत येऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. ही बंदी उठवण्यासाठी पोलीस आणि कारखाना संचालक यांच्यात एक बैठक झाली. परंतु ही बैठक व्यर्थ ठरली आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe