Maratha Reservation | मराठा समाज अजित पवारांच्या विरोधात आक्रमक; पवारांना बारामतीत नो एन्ट्री

Maratha Reservation | बारामती: राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला जालना जिल्ह्यात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली होती.

त्यानंतर हे आंदोलन संपूर्ण राज्यभर पेटलं आहे. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पुढार्‍यांसाठी अनेक गावकऱ्यांनी गाव बंदी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर बारामतीकरांनी देखील अजित पवारांना बारामती तालुक्यात येण्यास बंदी घातली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी कारखान्याच्या मोळी पूजनाला जाणार आहे. परंतु मराठा समाजाने त्यांच्या येण्यावर बंदी घातली आहे.

No entry for Ajit Pawar in Baramati for Maratha reservation?

मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) मराठा समाज अत्यंत आक्रमक झाला आहे. याची झळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील बसली आहे.

अजित पवार बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी कारखान्याच्या मोळी पूजनाला जाणार आहे. परंतु, सकल मराठा समाजाने अजित पवारांना गावबंदी घातली आहे.

ही गाव बंदी उठवण्यासाठी कारखाना संचालक आणि पोलिसांची बैठक पार पडली आहे. परंतु, ही बैठक निष्पळ ठरली आहे. यानंतर खरच मराठा समाज अजित पवारांना त्यांच्या बालेकिल्ल्यात येण्यास रोखू शकतो का? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Yogesh Kedar commented on Rohit Pawar

दरम्यान, मराठा समाजाने (Maratha Reservation) पुढार्‍यांसाठी गाव बंदी केलेली असताना रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाने रोहित पवार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी (Maratha Reservation) गाव बंदी केली आहे.

अशात रोहित पवार गावागावांना भेट देत आहेत. परंतु, यासाठी रोहित पवार अपवाद असू शकत नाही. त्यांनी लवकरात लवकर त्यांची यात्रा थांबवावी.

आज संध्याकाळपर्यंत जर त्यांनी त्यांची यात्रा थांबवली नाही तर मराठा समाज (Maratha Reservation) त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडेल, असं मराठा वनवास यात्रेचे योगेश केदार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.