Weather Update | ऑक्टोबर हीटपासून कधी मिळणार दिलासा? पाहा हवामान अंदाज

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यातून पावसाने पाय काढता घेतला आहे. यानंतर बहुतांश ठिकाणी परतीचा पाऊस कोसळला.

मात्र, त्यानंतर ऑक्टोबर हिटने नागरिकांना हैराण करून टाकलं होतं. अशात नागरिकांसाठी हवामान खात्याने दिलासादायक माहिती दिली आहे. लवकरच ऑक्टोबर हिट कमी होणार असून थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

The temperature will decrease in some districts of the state

मुंबई, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागामध्ये हवेत आर्द्रतेचं प्रमाण जास्त दिसून आलं आहे. त्यामुळे या भागात तापमान तीन ते चार अंश सेल्सिअसने जास्त आहे.

अशात पुढील काही दिवस मुंबईमध्ये उष्णतेची दाह कायम राहणार असल्याचा अंदाज (Weather Update) हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईमध्ये उष्णतेची दाह कायम राहणार असली तरी राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा कमी होणार आहे.

थोडक्यात या जिल्ह्यांमध्ये थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. पुणे, सोलापूर, सातारा, नाशिक, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पहाटेच्या वेळी गुलाबी थंडी भासायला लागली आहे. तर उत्तर महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा हळूहळू कमी होत चालला आहे.

दरम्यान, राज्यासह देशात देखील थंडीची चाहूल लागली आहे. उत्तर भारतामध्ये ईशान्य वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे बर्फवृष्टीला (Weather Update) सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे राज्यात देखील हळूहळू थंडीला सुरुवात होत आहे. परंतु, राज्यात अपेक्षित हिवाळा अजून सुरू झालेला नाही.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe