Share

Rohit Pawar | “रोहित पवारांनी संघर्ष यात्रा थांबवावी नाहीतर…”; मराठा समाज आक्रमक

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन सुरू असताना शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी अनेक गावकऱ्यांनी पुढाऱ्यांसाठी गाव बंदी केली आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, बीड, हिंगोली या जिल्ह्यातील बहुतांश गावामध्ये गाव बंदीचे फलक दिसून आले आहे. … Read more

Published On: 

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन सुरू असताना शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरू आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी अनेक गावकऱ्यांनी पुढाऱ्यांसाठी गाव बंदी केली आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, बीड, हिंगोली या जिल्ह्यातील बहुतांश गावामध्ये गाव बंदीचे फलक दिसून आले आहे.

अशात रोहित पवार गावागावांना भेट आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. रोहित पवार यांनी उद्या त्यांची यात्रा थांबवली नाही तर आम्ही त्यांची यात्रा थांबवू, असं मराठा वनवास यात्रेच्या योगेश केदार यांनी स्पष्ट केलं आहे.

Yogesh Kedar commented on Rohit Pawar

योगेश केदार म्हणाले, “आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांची सुरू असलेली यात्रा आजच्या आज थांबवावी. उद्या संध्याकाळपर्यंत ते जर चालताना दिसले तर सकल मराठा समाजाकडून त्यांचे कपडे काढल्या जाईल.

आम्ही तुम्हाला हा शेवटचा इशारा देत आहोत. तुमची ही यात्रा अजिबात खपवून घेतली जाणार नाही. मराठा समाजाने आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी गाव बंदी केलेली आहे. यासाठी रोहित पवार अपवाद असू शकत नाही, त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी त्यांची यात्रा थांबवावी.”

Gunaratna Sadavarte commented on Maratha Reservation

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “मनोज जरांगे यांनी माझ्यावर हल्ला केला. मात्र, हल्ला करून मला कोणीही शांत करू शकत नाही.

यापुढे आता कोणत्याही प्रकारचा हिंसाचार झाला तर कायदेशीर प्रक्रिया केली जाईल. 50 टक्के जागा या खुल्या प्रवर्गासाठी आहे. यामधील एकही जागा मी कुणालाही (Maratha Reservation) मिळू देणार नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही