Maratha Reservation | गुणरत्न सदावर्ते यांना चाप बसावा म्हणून त्यांची गाडी फोडली – मंगेश साबळे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation | मुंबई: मराठा समाजाचं आरक्षण मिळवण्यासाठी राज्यात तीव्र आंदोलन सुरू आहे. मराठ्यांचं हे आंदोलन दिवसेंदिवस तापत चाललं आहे.

अशात काल (26 ऑक्टोबर) वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची तोडफोड झाली आहे. मंगेश साबळे (Mangesh Sable) या मराठा आंदोलकांने ही तोडफोड केली आहे.

याच पार्श्वभूमीवर मंगेश साबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुणरत्न सदावर्ते यांना चाप बसावा म्हणून त्यांची गाडी फोडली असल्याचं मंगेश साबळे याने म्हटलं आहे.

Mangesh Sable commented on Gunaratna Sadavarte

मंगेश साबळे म्हणाले, “मराठा समाज अत्यंत माजोरडा आहे, असं गुणरत्न सदावर्ते म्हणतात. मराठ्यांना मी आरक्षण (Maratha Reservation) मिळू देणार नाही, असं देखील ते म्हणत असतात.

मराठ्यांची सभा म्हणजे एक प्रकारची जत्रा आहे, असं पण गुणरत्न सदावर्ते यांचं म्हणणं आहे. असं बोलून ते आमच्या भावनांना ठेच पोहोचवतात.

ते मराठ्यांचा इतिहास विसरले का? मराठ्यांना आरक्षण देऊ नका, त्यांच्या या वक्तव्याने आमच्या भावना दुखावतात. म्हणून गुणरत्न सदावर्ते यांना चाप बसावा, म्हणून मी त्यांची गाडी फोडली आहे.”

Gunaratna Sadavarte commented on Maratha Reservation

दरम्यान, या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते त्यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “माझ्या गाडीची माझ्या घराजवळ येऊन तोडफोड करण्यात आली आहे.

मनोज जरांगे म्हणायचे मराठा समाजाचं आंदोलन (Maratha Reservation) राज्य शासनाला झेपणार नाही पेलणार नाही. हेच का त्यांचं ते आंदोलन?

राज्य शासनाने फक्त मनोज जरांगे यांचं ऐकू नये, त्यांनी आमचं देखील म्हणणं ऐकून घ्यायला हवं. सरकारने मनोज जरांगे यांचे लाड थांबवले नाही तर मी देखील उपोषण करेल.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe