🕒 1 min read
Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी गेल्या महिन्यात अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं होतं.
त्यावेळी तब्बल 17 दिवस त्यांचं उपोषण चाललं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीवरून त्यांनी आपलं उपोषण मागे घेत राज्य सरकारला या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांचा कालावधी दिला होता.
परंतु, 40 दिवसात राज्य शासनाने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या कुटुंबाने राज्य शासनाला इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांच्या तब्येतीला काही झालं तर तुम्हाला घराबाहेर पडणं कठीण होईल, असा इशारा मनोज जरांगे यांच्या कुटुंबाने राज्य सरकारला दिला आहे.
Manoj Jarange’s father commented on Maratha Reservation
प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे यांचे वडील (Maratha Reservation) म्हणाले, “मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे, याला सरकारच जबाबदार आहे.”
Manoj Jarange’s daughter commented on Maratha Reservation
मनोज जरांगे यांची मुलगी म्हणाली, “मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या (Maratha Reservation) आणि माझ्या बाबांना घरी पाठवा, ही मी सरकारला हात जोडून विनंती करत आहे.
माझ्या बाबांच्या जीवाला काही झालं, तर तुमचं घरातून बाहेर निघणं कठीण होईल. आधी तुम्हाला गाव बंदी होती. परंतु, बाबांना काही झालं तर तुम्हाला जिल्हा बंदी देखील करण्यात येईल.”
Manoj Jarange’s wife commented on Maratha Reservation
मनोज जरांगे यांच्या पत्नी म्हणाल्या, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीवरून त्यांनी राज्य शासनाला मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांचा वेळ दिला.
परंतु, राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. माझी सरकारला हात जोडून विनंती आहे की मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी 17 दिवस लावू नका.”
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मराठ्यांच्या मुलाचं भलं होऊ नये, यासाठी फडणवीसांनी षडयंत्र रचलं – मनोज जरांगे
- Manoj Jarange | मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास दिला नकार
- Maratha Reservation | देशातील मराठ्यांची सरकारला गरज नाही; मनोज जरांगेंची मोदींवर टीका
- Maratha Reservation | मराठा आंदोलक पेटले; भाजप खासदाराच्या फोडल्या गाड्या
- Maratha Reservation | मराठा समाज आक्रमक; अजित पवारांना बारामतीत बंदी?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











