Maratha Reservation | जालना: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्य शासनाला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांचा वेळ दिला होता.
परंतु, राज्य सरकारने या 40 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. त्यानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहे.
त्यांच्या या उपोषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली नाही. त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
Manoj Jarange commented on Maratha Reservation
प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे (Maratha Reservation) म्हणाले, “सरकारला आता गोरगरिबांची गरज राहिलेली नाही.
देशातील क्षत्रिय आणि मराठ्यांची त्यांना गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना गोरगरिबांसोबत बोलले देखील नाही. परंतु, आम्ही आमचं आरक्षण मिळवूनच राहणार आहोत.”
दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक अत्यंत आक्रमक झाले आहे. काल मराठा आंदोलकांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली.
तर आज नांदेड जिल्ह्यातील आंदोलकांनी भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर (Prataprao Chikhalkar) यांच्या ताफ्यातील दोन गाड्या फोडल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील अंबुलगा गावात खासदार प्रताप चिखलकरांना गावबंदी करण्यात आली होती. परंतु, तरी देखील ते गावात दाखल झाले. त्यानंतर आक्रमक आंदोलकांनी (Maratha Reservation) त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्या फोडल्या.
तर दुसरीकडे बारामतीकर देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरून संतापले आहे. उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी कारखान्याच्या मोळी पूजनाला जाणार आहे.
परंतु, अजित पवारांनी ही पूजा करू नये, असं मराठा क्रांती मोर्चाने म्हटलं आहे. मराठा क्रांती मोर्चा अजित पवार यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात येण्यास थांबवणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मराठा आंदोलक पेटले; भाजप खासदाराच्या फोडल्या गाड्या
- Maratha Reservation | मराठा समाज आक्रमक; अजित पवारांना बारामतीत बंदी?
- Weather Update | राज्यात लागली थंडीची चाहूल, पाहा हवामान अंदाज
- Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एका तरुणाची आत्महत्या
- Maratha Reservation | मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या वकील सदावर्तेचा बोलविता धनी देवेंद्र फडणवीस