Share

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एका तरुणाची आत्महत्या

Maratha Reservation | छत्रपती संभाजीनगर: मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने गेल्या महिन्यात आंदोलन सुरू केलं होतं. त्यानंतर या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मराठा समाजाने राज्य शासनाला 40 दिवसांचा वेळ दिला होता. परंतु, या कालावधीमध्ये राज्य सरकारने मराठा आरक्षणावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मराठा समाज … Read more

Published On: 

Maratha Reservation | छत्रपती संभाजीनगर: मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने गेल्या महिन्यात आंदोलन सुरू केलं होतं.

त्यानंतर या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मराठा समाजाने राज्य शासनाला 40 दिवसांचा वेळ दिला होता. परंतु, या कालावधीमध्ये राज्य सरकारने मराठा आरक्षणावर निर्णय घेतलेला नाही.

त्यामुळे मराठा समाज आक्रमक झालेला असून मराठ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी अनेक तरुण आत्महत्या करताना दिसत आहे.

काल बीड जिल्ह्यात एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली होती. तर आज छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर तरुणांनी आत्महत्या केली आहे.

A youth committed suicide for Maratha reservation

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. गणेश कुबेर असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.

गणेश कुबेर हा सेकंड इयरमध्ये शिकत होता. त्याचबरोबर तो नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळेपर्यंत माझा अंत्यविधी करू नका, असं या तरुणाने  सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, काल बीड जिल्ह्यातील शहाजानपूर लोणी या गावातील 21 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अशोक मते असं या तरुणाचं नाव आहे.

राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देत नसल्यानं आत्महत्या करत असल्याचं अशोक याने त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

त्याचबरोबर त्याने मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच आत्महत्या केली असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी देखील सांगितलं आहे. काल आणि आज घडलेल्या घटनेनंतर मराठा आंदोलन आणखीन तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही