Maratha Reservation | मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या वकील सदावर्तेचा बोलविता धनी देवेंद्र फडणवीस

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation – मराठा आरक्षण प्रश्नावर एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन समाजाची फसवणूक करत आहेत तर दुसरीकडे सदावर्ते नावाचा वकील मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही, त्यासाठी सुप्रीम कोर्टात जाणार असे जाहीर करत आहे.

या सदावर्तेचा बोलविता धनी कोण आहे हे सर्वांना माहित आहे. याआधीही सदावर्तेनी विविध मुद्द्यांवर भाजपाधार्जिणी भूमिका घेतलेली आपण पाहिले आहे. सदावर्ते हा फडणवीस यांनी दिलेली भूमिका मांडत असतो.

यावरून मराठा आरक्षणाला कोणाचा विरोध आहे आणि मराठा विरुद्ध ओबीसी वाद कोण उभा करत आहे हे स्पष्ट होते. राहुल गांधी यांनी मांडलेली जातनिहाय जनगणनेची मागणी मान्य झाली तर आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

माझ्या मुलाने जे केलं ते मराठा समाजासाठी केलं; मंगेश साबळेंची आई भावूक

मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आंदोलन करत आहे. मराठा समाजाचं हे आंदोलन सुरू असताना वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या (Gunaratna Sadavarte) गाडीची तोडफोड झाल्याची धक्कादायक घटना घडली.

मंगेश साबळे या मराठा तरुणांने ही तोडफोड केली आहे. यानंतर मंगेश साबळे ( Mangesh Sable ) यांच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

याच पार्श्वभूमीवर मंगेश साबळे यांच्या आई चंद्रकला साबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मुलाने जे केलं ते मराठा समाजासाठी केलं त्यामुळे त्याला सोडावं, असं मंगेश साबळे यांच्या आईने म्हटलं आहे.

Gunaratna Sadavarte Commented On  Manoj Jarange

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “माझ्या घराजवळ येऊन माझ्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. मराठा समाजाचं आंदोलन राज्य शासनाला पेलणार नाही झेपणार नाही, असा इशारा मनोज जरांगे (Maratha Reservation) यांनी दिला होता. हेच का त्यांचं झेपणार आणि पेलणार नाही.

फक्त मनोज जरांगे यांचं ऐकून घेऊ नका, असं माझं राज्य शासनाला म्हणणं आहे. आमचं देखील तुम्ही ऐकायला हवं. आता मनोज जरांगे यांचे लाड थांबले नाही तर मी देखील उपोषण करणार आहे.

Manoj Jarange Commented On Gunaratna Sadavarte

दरम्यान, या घटनेवर मनोज जरांगे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मराठा समाज सध्या हजारो गावांमध्ये आंदोलन करत आहे. आमचं हे आंदोलन (Maratha Reservation) अत्यंत शांततेत सुरू आहे.

मराठा समाज शांतता सोडून कधीच वेगळ्या पद्धतीने आंदोलन (Maratha Reservation) करणार नाही. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड कोणी केली? हे आम्हाला माहित नाही. मात्र आम्ही तोडफोडीचे समर्थन करत नाही.”

Sanjay Gaikwad Commented On Gunaratna Sadavarte

संजय गायकवाड म्हणाले, “गुणरत्न सदावर्ते यांच्या नालायकपणामुळे मराठा समाजाचं आरक्षण (Maratha Reservation) हिरावून घेतलं गेलं. त्यांनी अत्यंत प्रखरपणे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विरोधात कोर्टात बाजू मांडली होती. त्यावेळी ते अत्यंत सुडाने पेटलेले होते.

त्यामुळे त्यांच्या गाडीची तोडफोड झाली, ही शिक्षा त्यांच्यासाठी अत्यंत कमी आहे. त्यांना संपायला हवं होतं. गुणरत्न सदावर्ते संपले असते तर मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मार्ग मोकळा झाला असता.

त्यामुळे ज्याने कोणी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की गाडी फोडण्याऐवजी मोठं काहीतरी करायला हवं होतं.”

ओबीसी जनजागरण यात्रा..

केंद्रातील मोदी सरकार हे आरक्षण विरोधी आहे. जातनिहाय जनगणनेलाही मोदी सरकारचा विरोध आहे. हे सरकार जातनिहाय जनगणनाही करत नाही आणि डॉ. मनमोहनसिंह सरकारने केलेली जनगणनाही जाहीर करत नाही. मागास समाजांना आणखी कमजोर करण्याचे काम भाजपा सरकार करत आहे.

राहुल गांधी यांनी मांडलेली जातनिहाय जनगणनेची भूमिका राज्यातील जनतेसमोर मांडण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीचा ओबीसी विभाग ३ जानेवारीपासून राज्यात ओबीसी जनजागरण यात्रा काढणार आहे. ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढली जाणार आहे.

सुतळी खरेदीमध्येही भ्रष्टाचार..

राज्यातील शिंदे प्रणित भाजपा सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आता या सरकारने सुतळी खरेदीमध्येही भ्रष्टाचार केला आहे. बाजारात ७२ रुपये किलो दराने मिळणारी सुतळी या सरकारने ४१० रुपये किलो दराने खरेदी करुन कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.

किमती वाढवून टेंडर देण्यासाठी निर्मल भवनमध्ये लुटारु बसले आहेत. जनतेच्या घामाचा पैशाची दिवसाढवळ्या लुट सुरु आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, ड्रग माफिया, दरोडेखोर, महिला अत्याचार वाढले आहेत पण सरकार मात्र कुंभकर्णी झोपेत आहे असेही नाना पटोले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe