Marathi People | तेरा बाप भी हमे मुंबई से नही निकाल सकता; परप्रांतीयांची मुंबईकरांना धमकी

Marathi People | मुंबई: मुंबई शहरात मराठी माणसाची किंमत दिवसेंदिवस कमी होत चालली असल्याचं विरोधक सातत्याने म्हटलं असतात.

मुंबईवर परप्रांतीय लोक आपला हक्क गाजवत असल्याचं देखील विरोधक म्हणत असतात. अशात सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. मुंबई आधी गुजरात आणि महाराष्ट्राचा भाग होता. त्यामुळे मुंबईतून आम्हाला तुझा बाप सुद्धा काढू शकत नाही.

हवं तर आम्हाला मुंबईतून काढायचा प्रयत्न करून बघा. आम्ही आमच्या सोसायटीमध्ये नॉनव्हेज आणायला परवानगी देऊ शकत नाही, असा या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेला आहे.

या पोस्ट वरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

A Gujarati man insults a Maharashtra man

ट्विट करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) म्हणाले, “इथल्या मराठी माणसाला,जर एखादा परप्रांतीय व्यक्ती दम देणार असेल तर,एकूणच परिस्थिती एकदम अवघड आहे. खालचा स्क्रीनशॉट पाहा.

एक गुजराती माणूस इथ महाराष्ट्राच्या व्यक्तीला शिव्या देत,”तेरा बाप भी नहीं निकाल सकता यहा से हम लोगो को, ट्राय करके देख ले” सारख्या धमक्या देतोय.वरून मासांहारी लोकांना आम्ही आमच्या सोसायटीत स्थान देणार नाही,अशी देखील वल्गना करतोय.

हे वास्तव आहे. दक्षिण मुंबई मधे बहुतेक सोसायटीज मध्ये non- veg खाणाऱ्या कुटुंबांना घर देत नाहित. ही सरासर दादागिरी आहे जी मराठी लोक खूप वर्षांपासून सहन करत आहेत.

बाकी स्वाभिमान विकलेल्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून काहीही अपेक्षा करणेच मुळात गैर आहे. बाकी, मुंबई पोलिसांकडून आपल्याकडून थोडी अपेक्षा आहे.अन्यथा हे लोण वाढत जाईल.”

 

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.