Share

Maratha Reservation | मनोज जरांगेंचे लाड थांबवले नाही तर मी उपोषण करेल; गुणरत्न सदावर्ते आक्रमक

🕒 1 min read Maratha Reservation | मुंबई: मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून दिवसेंदिवस पेटत चालला आहे. अशात आज सकाळी सहाच्या सुमारास वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड झाली आहे. मराठा आंदोलकांनी ही तोडफोड केली असल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना अटक करण्याची मागणी देखील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Maratha Reservation | मुंबई: मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून दिवसेंदिवस पेटत चालला आहे. अशात आज सकाळी सहाच्या सुमारास वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड झाली आहे.

मराठा आंदोलकांनी ही तोडफोड केली असल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना अटक करण्याची मागणी देखील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर मराठा समाज आणखीन आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Gunaratna Sadavarte commented on  Manoj Jarange

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “माझ्या घराजवळ येऊन माझ्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. मराठा समाजाचं आंदोलन राज्य शासनाला पेलणार नाही झेपणार नाही, असा इशारा मनोज जरांगे (Maratha Reservation) यांनी दिला होता. हेच का त्यांचं झेपणार आणि पेलणार नाही.

फक्त मनोज जरांगे यांचं ऐकून घेऊ नका, असं माझं राज्य शासनाला म्हणणं आहे. आमचं देखील तुम्ही ऐकायला हवं. आता मनोज जरांगे यांचे लाड थांबले नाही तर मी देखील उपोषण करणार आहे.

मी थांबणार नाही. मी माझ्या विद्यापीठ आणि कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांशी यासंदर्भात चर्चा करणार आहे. जालना जिल्ह्यात आंदोलन (Maratha Reservation) सुरू असताना पोलिसांवर हल्ला झाला होता. पोलीस हल्ल्यापासून जी घटना सुरू झाली ती माझ्या घरापर्यंत आली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांना अटक करा.”

Manoj Jarange commented on Gunaratna Sadavarte

दरम्यान, या घटनेवर मनोज जरांगे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मराठा समाज सध्या हजारो गावांमध्ये आंदोलन करत आहे. आमचं हे आंदोलन (Maratha Reservation) अत्यंत शांततेत सुरू आहे.

मराठा समाज शांतता सोडून कधीच वेगळ्या पद्धतीने आंदोलन (Maratha Reservation) करणार नाही. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड कोणी केली? हे आम्हाला माहित नाही. मात्र आम्ही तोडफोडीचे समर्थन करत नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही